माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज 2025: “मेक द वर्ल्ड वेअर खादी” चॅलेंजसाठी अंतिम स्पर्धकांची घोषणा
750 मधून सर्वोत्तम : खादीची पुनर्कल्पना करणाऱ्या विजयी अभियानांना वेव्हजमध्ये गौरवण्यात येणार
Posted On:
09 APR 2025 7:50PM by PIB Mumbai
मुंबई, 9 एप्रिल 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया (एएएआय) च्या सहकार्याने, 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हज शिखर परिषद 2025 चा भाग म्हणून आयोजित 32 क्रिएटिव्ह इन इंडिया चॅलेंजपैकी एक असलेल्या मेक द वर्ल्ड वेअर खादीसाठी अंतिम स्पर्धकांची नावे जाहीर केली आहेत.

निवड झालेले उमेदवार:
- इमान सेनगुप्ता आणि सोहम घोष - हवास वर्ल्डवाइड इंडिया
- कार्तिक शंकर आणि मधुमिता बसू - 22 फूट ट्रायबल
- काजल तिर्लोटकर - इंटरॅक्टिव्ह अव्हेन्यूज
- तन्मय राऊल आणि मंदार महाडिक - डीडीबी मुद्रा ग्रुप
- आकाश मेजारी आणि काजोल जेसवानी - डीडीबी मुद्रा ग्रुप
आपल्या कामामागील अंतर्दृष्टी सामायिक करताना, सहभागींनी - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक ते शाश्वत फॅशनसाठी उपाय अशी खादीची विकसित झालेली ओळख याबाबत आपले विचार मांडले.
काजल तिर्लोटकर यांनी खादीचे वर्णन "कालातीत दाखला ... सावकाश , भावपूर्ण आणि काळजीपूर्वक विणलेले " असे केले, तर तन्मय राऊल आणि मंदार महाडिक यांनी खादीला "भविष्यातील कापड" असे संबोधित करताना वेगाने बदलणाऱ्या फॅशनमुळे होणाऱ्या पर्यावरणीय ऱ्हासाला सामोरे जाण्याची त्याची क्षमता अधोरेखित केली. आकाश मेजारी आणि काजोल जेसवानी यांनी पर्यावरणीय नुकसान "पूर्ववत" करण्याचे साधन म्हणून खादीवर लक्ष केंद्रित करताना , त्यांच्या मोहिमेद्वारे हवामान-जागरूक कृतीला प्रोत्साहन दिले.

तर इमान सेनगुप्ता आणि सोहम घोष यांनी खादीच्या आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्यावर भर दिला आणि जागतिक फॅशनमध्ये खादी हा एक प्रीमियम, उद्देश-चालित पर्याय म्हणून त्याचे समर्थन केले.
शाश्वतता आणि अस्मितेचे जागतिक प्रतीक म्हणून खादीची पुनर्कल्पना करण्यासाठी आयोजित या स्पर्धेत देशभरातील सर्जनशील व्यावसायिक आणि एजन्सींकडून 750 हून अधिक जणांनी नोंदणी केली. सहभागींना अशा जाहिरात मोहिमा तयार करण्याचे आव्हान देण्यात आले होते ज्यात खादीला केवळ एक कापड म्हणून नव्हे तर जागतिक स्तरावर नवोन्मेष आणि जागरूक जीवनाचे एक शक्तिशाली प्रतीक म्हणून स्थान दिले असेल.
जाहिरात उद्योगातील धुरीणांच्या एका प्रतिष्ठित ज्युरीने कल्पकता, सांस्कृतिक महत्व, जागतिक आकर्षण आणि स्पर्धेच्या मुख्य संदेशाशी सुसंगत यावर आधारित प्रवेशिकांचे मूल्यांकन केले. निवड झालेल्या प्रवेशिकांचे त्यांची धोरणात्मक विचारसरणी, आकर्षक कथा आणि खादी ही जागतिक चळवळ बनवण्याची त्यांची क्षमता यासाठी कौतुक करण्यात आले.
वेव्हज समिट 2025 दरम्यान अंतिम विजेत्यांची नावे जाहीर केली जातील आणि त्यांचा सत्कार केला जाईल, तसेच त्यांचा प्रवास धोरणकर्ते, जागतिक प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी आणि उद्योग धुरिणांसमोर सादर केला जाईल.
वेव्ह्ज संबंधी
केंद्र सरकारने महाराष्ट्रात, मुंबई येथे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद म्हणजेच वेव्हज आयोजित केली असून हा कार्यक्रम माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
तुम्ही या उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक असा अथवा, गुंतवणूकदार, सर्जक अथवा नाविन्यपूर्ण निर्मिती करणारे असा, या शिखर परिषदेत तुम्हाला इतरांशी जोडले जाण्यासाठी, सहयोगासाठी, नव्या संशोधनासाठी आणि माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रात योगदान देण्यासाठी अनोखा जागतिक मंच उपलब्ध होईल.
आशय निर्मिती, बौद्धिक मालमत्ता आणि तांत्रिक नवोन्मेष यांसाठीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावत वेव्हज हा उपक्रम भारताची सर्जनशील क्षमता वाढवेल. या कार्यक्रमात प्रसारण, मुद्रित माध्यमे, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल माध्यमे, समाज माध्यम मंच, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता, वर्धित वास्तव (एआर), आभासी वास्तव (व्हीआर) तसेच विस्तारित वास्तव (एक्सआर) या उद्योगांवर आणि क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे येथे मिळतील.
Stay updated with the latest announcements from PIB Team WAVES
चला ! वेव्हज साठी आताच नोंदणी करा.
* * *
PIB Mumbai | S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2120578)
Visitor Counter : 27
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam