पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान मोदी यांनी घेतली म्यानमारचे वरिष्ठ जनरल मिन आंग ह्लाईंग यांची भेट.
प्रविष्टि तिथि:
04 APR 2025 9:43AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉकमध्ये झालेल्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या निमित्ताने म्यानमारचे वरिष्ठ जनरल मिन आंग ह्लाईंग यांची भेट घेतली. अलिकडेच म्यानमार मध्ये भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल मोदी यांनी पुन्हा एकदा शोक संवेदना व्यक्त केल्या .
या कठीण काळात म्यानमारच्या बंधू आणि भगिनींना भारताकडून मदतीचे आश्वासन मोदी यांनी दिले आहे. दोन्ही नेत्यांनी भारत आणि म्यानमारमधील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली ज्यात दळणवळण , क्षमता बांधणी, पायाभूत सुविधा विकास आणि अन्य या विषयांचा समावेश होता .
'एक्स' या समाज माध्यमावरील एका संदेशामध्ये त्यांनी लिहिले आहे ,
“बँकॉकमध्ये झालेल्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या निमित्ताने म्यानमारचे वरिष्ठ जनरल मिन आंग ह्लाईंग यांची भेट घेतली. अलिकडेच भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल पुन्हा एकदा शोक संवेदना व्यक्त केल्या. या कठीण काळात भारत म्यानमारच्या आपल्या भगिनी आणि बंधूना सर्वतोपरी मदत करत आहे.. आम्ही, भारत आणि म्यानमारमधील द्विपक्षीय संबंधांवर देखील चर्चा केली, विशेषतः दळणवळण, क्षमता बांधणी, पायाभूत सुविधा विकास यावर सविस्तर चर्चा केली."
***
JPS/RD/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2118637)
आगंतुक पटल : 64
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam