पंतप्रधान कार्यालय
पाली भाषेतील तिपिटकची प्रत दिल्याबद्दल पंतप्रधानांनी थायलंडच्या पंतप्रधानांचे मानले आभार
प्रविष्टि तिथि:
03 APR 2025 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाली भाषेतील तिपिटकाची प्रत दिल्याबद्दल थायलंडच्या पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांचे आभार मानले. पाली ही एक सुंदर भाषा आहे असे सांगत या भाषेने भगवान बुद्धांच्या शिकवणीचे सार स्वतःमध्ये सामावून घेतले आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
समाजमाध्यम एक्स वर पोस्ट करताना त्यांनी लिहिले:
"ही अतिशय खास भेट आहे! पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांनी मला पाली भाषेतील तिपिटकाची प्रत दिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत कृतज्ञ आहे. पाली ही खरोखरच एक सुंदर भाषा आहे, ज्यामध्ये भगवान बुद्धांच्या शिकवणीचे सार अंतर्भूत आहे. तुम्हाला माहीतच आहे की आमच्या सरकारने गेल्या वर्षी पालीला ‘अभिजात भाषा’ म्हणून दर्जा प्रदान केला. जगभरातील लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, त्यामुळे या भाषेवरील संशोधन आणि अध्ययनाला प्रोत्साहन मिळाले आहे."
@ingshin”
* * *
S.Kane/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2118398)
आगंतुक पटल : 42
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam