वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल करणार स्टार्टअप महाकुंभाचे उद्घाटन
स्टार्टअप महाकुंभाचा दुसरा भाग 3 ते 5 एप्रिल दरम्यान भारत मंडपम येथे होणार
या कार्यक्रमात 45 हून अधिक आदिवासी उद्योजक सहभागी होणार
50 हून अधिक देशांचे प्रतिनिधित्व पाहण्यासाठी कार्यक्रम
Posted On:
02 APR 2025 7:47PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल 3 ते 5 एप्रिल 2025 दरम्यान भारत मंडपम येथे होणाऱ्या दुसऱ्या स्टार्टअप महाकुंभाचे उद्घाटन करतील. भारताच्या आर्थिक विकासात आणखी योगदान देणे आणि भारताची उलगडणारी कहाणी जगासमोर आणणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री जितिन प्रसाद उद्घाटन कार्यक्रमादरम्यान विशेष भाषण करतील.
या कार्यक्रमाचे अतुलनीय प्रमाण आणि सहभागींचे वैविध्य उद्योजक, गुंतवणूकदार आणि विचारवंतांना एकत्र येण्यासाठी, कल्पना सामायिक करण्यासाठी तसेच कायमस्वरूपी संबंध निर्माण करण्यासाठी एक अमूल्य व्यासपीठ प्रदान करेल. नवोन्मेष आणि सहकार्याला चालना देण्यावर भर देऊन, स्टार्टअप महाकुंभ उद्योजकीय यशाच्या पुढील लाटेचा पाया रचेल. या वर्षीच्या आवृत्तीत आदिवासी उद्योजक देखील आयआयएम कलकत्ता, आयआयएम काशीपूर आणि आयआयटी भिलाई याच्याशी संबंधित 45+ स्टार्टअप्सच्या सहभागासह मंचावर उतरणार आहेत.
या कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट करताना, डीपीआयआयटीचे संयुक्त सचिव संजीव म्हणाले, “जिले से जगत तक हा स्टार्टअप महाकुंभ भारतीय जिल्ह्यांमधील तसेच जगभरातील स्टार्टअप आणि उद्योग 'महारथीं'चा खरा 'संगम' असेल - भारतातील अनेक जिल्ह्यांमधील आणि 50 देशांच्या प्रतिनिधित्वासह हा कार्यक्रम एकमेकांशी जोडण्याची आणि सहयोग करण्याची एक उत्तम संधी असेल. एका बाजूला भारतात बनवलेली फ्लाइंग टॅक्सी प्रदर्शित केली जाईल, तर दुसरीकडे कोरियासारखे देश 11 स्टार्टअप्सचा मंडप उभारतील आणि नेपाळ सर्वात मोठा मंडप उभारणार असून त्यामध्ये त्यांच्या एका स्टार्टअपमध्ये शाश्वत हायब्रिड प्रोपल्शन रॉकेट इंजिनद्वारे चालवले जाणारे 2-स्टेज रॉकेट प्रदर्शित केले जाईल. मी खरोखरच उत्सुक आहे आणि पुढील तीन दिवसांमध्ये काही अभूतपूर्व कल्पना आणि समृद्ध चर्चा होण्याची वाट पाहत आहे.”
या प्रमुख स्टार्टअप कार्यक्रमाच्या पहिल्या आवृत्तीत 26+ राज्ये आणि 14+ देशांमधील उत्कृष्ट स्टार्टअप्स, सूनिकॉर्न आणि युनिकॉर्नसह 1306 प्रदर्शकांचा समावेश असलेले 48,581 हून अधिक व्यावसायिक अभ्यागत सहभागी झाले. या कार्यक्रमात 300+ इनक्यूबेटर आणि अॅक्सिलरेटर तसेच 200+ आघाडीचे देवदूत गुंतवणूकदार, व्हीसी आणि कुटुंब कार्यालये देखील सहभागी झाली होती.
स्टार्टअप महाकुंभ भारतातील संपूर्ण स्टार्टअप इकोसिस्टमला एकत्र आणतो ज्यामध्ये उद्योजक, गुंतवणूकदार, इन्क्यूबेटर व अॅक्सिलरेटर आणि अनेक क्षेत्रातील उद्योजक नेते यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व फिक्की, असोचॅम, आय व्ही सी ए आणि बूटस्ट्रॅप अॅडव्हायझरी अँड फाउंडेशन करत आहे; आणि SIDB, GEM, ECGC, Meity आणि DPIIT स्टार्टअप इंडिया यांचे याला समर्थन आहे.
अधिक माहितीसाठी, www.startupmahakumbh.org ला भेट द्या.
***
S.Patil/N.Mathure//P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2118070)
Visitor Counter : 14