पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा बेल्जियमचे राजे फिलीप यांच्याशी संवाद
Posted On:
27 MAR 2025 10:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेल्जियमचे राजे फिलीप यांच्याशी संवाद साधला. बेल्जियमच्या राजकन्या ऍस्ट्रीड यांच्या नेतृत्वाखाली बेल्जियन आर्थिक मंचाने नुकत्याच दिलेल्या भारतभेटीची त्यांनी प्रशंसा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, व्यापार व गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि नवोन्मेष व शाश्वतता यामधील सहकार्य वृद्धिंगत करणे याविषयी चर्चा केली.
एक्स माध्यमावरील संदेशात त्यांनी म्हटले आहे,
“बेल्जियमचे राजे फिलीप यांच्याशी संवाद साधणे आनंददायी होते. राजकन्या ऍस्ट्रीड यांच्या नेतृत्वाखालील बेल्जियन आर्थिक मंचाच्या नुकत्याच पार पडलेल्या भारतभेटीची प्रशंसा केली. आम्ही द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करणे, व्यापार व गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि नवोन्मेष व शाश्वतता यातील सहकार्य वृद्धिंगत करणे याविषयी चर्चा केली.
@MonarchieBe”
* * *
S.Patil/S.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115989)
Visitor Counter : 50
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam