गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार नक्षलवाद्यांविरोधात कठोर दृष्टिकोनासह आगेकूच करत आहे- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह
आज आपल्या जवानांनी 'नक्षलमुक्त भारत अभियान'च्या दिशेने आणखी एक मोठे यश संपादन केले आहे
पुढील वर्षी 31 मार्चपूर्वी देश नक्षलमुक्त होईल
Posted On:
20 MAR 2025 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार नक्षलवाद्यांविरोधात कठोर दृष्टिकोन बाळगून आगेकूच करत आहे असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.
सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये 22 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्र्यांनी एक्स वरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की आज आपल्या जवानांनी 'नक्षलमुक्त भारत अभियान' च्या दिशेने आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. ते म्हणाले की, छत्तीसगडमधील बिजापूर आणि कांकेर येथे आपल्या सुरक्षा दलांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये 22 नक्षलवादी मारले गेले. ते पुढे म्हणाले की, मोदी सरकार नक्षलवाद्यांविरोधात कुठलीही दयामाया न दाखवता कठोर कारवाईचा दृष्टिकोन बाळगून आगेकूच करत आहे आणि आत्मसमर्पणापासून समावेशापर्यंतच्या सर्व सुविधा देऊनही आत्मसमर्पण न करणाऱ्या नक्षलवाद्यांप्रति शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबत आहे. पुढील वर्षी 31 मार्चपूर्वी देश नक्षलमुक्त होईल असे शाह म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली,नक्षलवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरणाचा भाग म्हणून,2025 मध्ये आतापर्यंत 90 नक्षलवादी मारले गेले आहेत, 104 जणांना अटक करण्यात आली आहे आणि 164 जणांनी आत्मसमर्पण केले आहे.2024 मध्ये,290 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले ,1090 जणांना अटक करण्यात आली आणि 881 जणांनी आत्मसमर्पण केले आहे.आतापर्यंत एकूण 15 प्रमुख नक्षलवादी नेत्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
2004 ते 2014 दरम्यान, नक्षलवादी हिंसाचाराच्या एकूण 16,463 घटना घडल्या. तर , 2014 ते 2024 या मोदी सरकारच्या कार्यकाळात,हिंसक घटनांची संख्या 53 टक्क्यांनी कमी होऊन 7,744 वर आली.
त्याचप्रमाणे, 2014 मध्ये, देशातील 126 जिल्हे नक्षलग्रस्त होते, परंतु 2024 पर्यंत, अशा जिल्ह्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊन अवघी 12 इतकी राहिली आहे.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2113435)
Visitor Counter : 36
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam