माहिती आणि प्रसारण मंत्रालय
हाँगकाँगच्या फिलमार्टमध्ये भारतीय दालनाचा ऐतिहासिक प्रारंभ
हाँगकाँग (फिलमार्ट) येथे प्रथमच सुरु झालेल्या भारतीय दालनाचे हाँगकाँग मधील भारताच्या कौन्सुल जनरल यांच्या हस्ते उद्घाटन
“हे दालन भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी जागतिक भागीदारीच्या नव्या युगाचे प्रतिनिधित्व करते” भारताच्या कौन्सुल जनरल सतवंत खनालीया यांचे प्रतिपादन
Posted On:
19 MAR 2025 9:10PM by PIB Mumbai
मुंबई, 19 मार्च 2025
जागतिक मंचावरील भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी उल्लेखनीय क्षण साजरा करत, भारतीय दालनाने प्रथमच हाँगकाँग आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी बाजारात (फिलमार्ट) प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि माध्यम उद्योगात भारताची उपस्थिती समर्थपणे नोंदवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत हाँगकाँग आणि मकाऊ मधील भारताच्या कौन्सुल जनरल सतवंत खनालीया यांनी या दालनाचे उद्घाटन केले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील सेवा निर्यात प्रोत्साहन मंडळ (एसईपीसी) आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या भारतीय दालनाला हाँगकाँग आणि मकाऊ मधील भारताच्या कौन्सुल जनरल यांचा पाठींबा लाभला आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देत आणि भारताच्या कथाकथन कौशल्यातील अमर्याद क्षमतेचे दर्शन घडवत हा उपक्रम भारतीय चित्रपटांचा वाढता प्रभाव आणि त्याच्या विस्तारणाऱ्या जागतिक पदचिन्हांना अधोरेखित करतो.
VR1G.jpeg)
उद्घाटन प्रसंगी सतवंत खनालिया यांनी भारताच्या जोशपूर्ण चित्रपटीय परिदृश्याबद्दल अभिमान व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “फिलमार्टमधील पहिल्यावहिल्या भारतीय दालनाचे उद्घाटन करणे हा सन्मान आहे. भारतातील चित्रपट उद्योग हा जगातील काही मोठ्या चित्रपट उद्योगांमध्ये गणला जातो आणि या चित्रपटांच्या कथा विविध संस्कृतींमधील प्रेक्षकांना भावतात. हे दालन भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी जागतिक भागीदारीच्या आणि संधींच्या नव्या युगाचे प्रतिनिधित्व करते.
वेव्हज ची जाहिरात: भारताची प्रमुख जागतिक माध्यम आणि मनोरंजन परिषद
येत्या 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत आयोजित जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेची (वेव्हज) जाहिरात करण्यावर भारतीय दालनात अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. जागतिक माध्यमे आणि मनोरंजन (एम आणि ई) उद्योगाचे लक्ष भारताकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने आणि व्यापार नवोन्मेष तसेच सीमापार सहयोगी संबंध जोपासण्याच्या उद्देशाने आयोजित वेव्हज हा प्रमुख मंच असेल. उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती, नवनिर्माते आणि भागीदार यांच्या वैविध्यपूर्ण मेळाव्यासह वेव्हज हा कार्यक्रम भारताला जगाचे सामग्रीकेंद्र म्हणून स्थापित करेल.
सहयोगाला चालना आणि संधींचा विस्तार
फिलमार्टमधील भारतीय दालनात पहिल्या दिवशी उपक्रम, संवादांचे आयोजन, बैठका तसेच आंतरराष्ट्रीय उद्योग प्रतिनिधींशी नेटवर्किंग सत्रे असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सह-निर्मिती, सामग्री वितरण आणि सहयोग अशा विषयांवर आधारित चर्चांसाठी या दालनाने मदत केली आणि भारतीय चित्रपट निर्माते आणि सामग्री सर्जकांना नव्या बाजारपेठांचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांची जागतिक पोहोच विस्तारण्यासाठी नवी कवाडे उघडून दिली.
FBX3.jpeg)
एनएफडीसीविषयी माहिती
देशात उत्तम चित्रपट निर्मितीच्या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी एनएफडीसी म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ही केंद्रीय संस्था स्थापन करण्यात आली. फिलमार्ट, कान्स चित्रपट महोत्सव आणि बर्लीनेल यांसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतील सहभागाद्वारे एनएफडीसी भारतातील सामग्री सर्जकांना सह-निर्मिती, बाजारपेठ पोहोच आणि वितरणविषयक संधी मिळण्यात सुलभता आणते.
वेव्हज विषयी माहिती
भारत सरकारने मुंबई येथे दिनांक 1 मे ते 4 मे 2025 या कालावधीत देशातील माध्यमे आणि मनोरंजन (एम आणि ई)क्षेत्रासाठी महत्वाचा कार्यक्रम असलेल्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) आयोजन केले आहे.
तुम्ही उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक असा, गुंतवणूकदार असा किंवा नवनिर्मिती करणारे असा, ही परिषद तुम्हाला परस्परांशी स्मवाद साधण्यासाठी, सहयोगासाठी, नवनिर्मिती करण्यासाठी तसेच एम आणि ई परीदृश्यात योगदान देण्यासाठी अभूतपूर्व जागतिक मंच देऊ करते.
वेव्हज हा कार्यक्रम भारताच्या सर्जक क्षमतेला मोठा वाव देईल, तसेच सामग्री निर्मिती, बौद्धिक संपदा आणि तांत्रिक नवोन्मेष यांचे मोठे केंद्र म्हणून भारताचे स्थान विस्तारेल. प्रसारण, छापील माध्यमे, दूरचित्रवाणी, रेडिओ, चित्रपट, अॅनिमेशन, दृश्य परिणाम, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल माध्यमे, समाज माध्यम मंच, उत्पादकक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता, वर्धित वास्तव (एआर), आभासी वास्तव (व्हीआर) आणि विस्तारित वास्तव (एक्सआर) हे उद्योग आणि क्षेत्रांवर या कार्यक्रमात अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
काही प्रश्न आहेत? उत्तरासाठी येथे क्लिक करा.
या, आमच्यासह विहार करा! वेव्हज साठी आत्ताच नोंदणी करा (लवकरच येत आहोत!)
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2113090)
Visitor Counter : 35