पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमाकांत रथ यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
16 MAR 2025 2:53PM by PIB Mumbai
प्रख्यात कवी आणि विद्वान रमाकांत रथ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. रमाकांत रथ यांचे साहित्य विशेषतः कवितांनी, समाजाच्या सर्व घटकांमध्ये व्यापक लोकप्रियता मिळवली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे;
“रमाकांत रथ जी यांनी एक प्रभावी प्रशासक आणि अभ्यासक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यांच्या साहित्याने, विशेषतः कवितांनी, समाजाच्या सर्व घटकांमध्ये व्यापक लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या निधनाने अतिव दुःख झाले. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.”: पंतप्रधान @narendramodi”
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2111617)
आगंतुक पटल : 74
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada