पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेल्जियमच्या राजकुमारी अॅस्ट्रिड यांची भेट घेतली
भारतभेटीवर आलेल्या 300 सदस्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी राजकुमारी अॅस्ट्रिड यांच्या पुढाकाराचे पंतप्रधानांनी केले खूप कौतुक
बेल्जियमच्या राजघराण्याच्या भारताशी असलेल्या सकारात्मक संबंधांचे पंतप्रधानांकडून स्मरण
व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण, शेती, जीवशास्त्र, अंतराळ, कौशल्य यासारख्या क्षेत्रांमध्ये बेल्जियमसोबत नवीन परस्पर फायदेशीर भागीदारीसाठी दोन्ही नेत्यांची कटिबद्धता
प्रविष्टि तिथि:
04 MAR 2025 9:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 04 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेल्जियमच्या राजकुमारी अॅस्ट्रिड यांची भेट घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली 1 ते 8 मार्च 2025 दरम्यान भारतात उच्चस्तरीय बेल्जियन आर्थिक अभियान सुरू आहे.
पंतप्रधानांनी राजकुमारी अॅस्ट्रिड यांचे भारतात स्वागत केले आणि प्रमुख व्यावसायिक नेते, सरकारी अधिकारी आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींसह 300 हून अधिक सदस्यांच्या मोठ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या पुढाकाराचे खूप कौतुक केले.
राजकुमारी अॅस्ट्रिड यांची भारतात आर्थिक अभियानाचे नेतृत्व करण्याची ही दुसरी वेळ आहे, ज्याद्वारे उभय देशांमधील प्रगतीपथावर असणाऱ्या मजबूत आर्थिक संबंधांचे महत्त्व अधोरेखित होते.
पंतप्रधान आणि राजकुमारी अॅस्ट्रिड यांच्यात झालेल्या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, नवोन्मेष, स्वच्छ ऊर्जा, पायाभूत सुविधा, शेती, कौशल्य, शैक्षणिक आदानप्रदान तसेच सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर संबंधासह विविध क्षेत्रांचा समावेश होता.
दोन्ही बाजूंनी उदयोन्मुख आणि उच्च-प्रभाव असलेल्या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी नवीन मार्ग शोधण्यासाठी बारकाईने काम करण्यास सहमती दिली, ज्यामुळे आर्थिक लवचिकता मजबूत होईल, नवोन्मेष -नेतृत्वाखालील विकासाला चालना मिळेल आणि दोन्ही देशांच्या जनहितासाठी द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ होईल.
Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2108584)
आगंतुक पटल : 45
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam