माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या (IIMC) 56 व्या दीक्षांत समारंभाचे दिनांक 4 मार्च 2025 रोजी आयोजन -केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित
नवी दिल्ली आणि पाच प्रादेशिक शाखांमधील 478 विद्यार्थ्यांना पदविका आणि उत्कृष्टता पुरस्काराने दीक्षांत समारंभात करणार सन्मानित
Posted On:
03 MAR 2025 3:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2025
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) दिनांक 4 मार्च 2025 रोजी महात्मा गांधी मंच,( IIMC), नवी दिल्ली येथे आपला 56 वा दीक्षांत समारंभ आयोजित करत आहे.आयआयएमसीचे कुलपती आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री; रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, भारत सरकार,अश्विनी वैष्णव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी 2023-24 यावर्षीच्या विद्यार्थ्यांना पदविका आणि उत्तम यशाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
या दीक्षांत समारंभात 2023-24 यावर्षांच्या 9 अभ्यासक्रमांतील 478 विद्यार्थ्यांचा यशस्वीपणे अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र देऊन गौरव केला जाईल.आयआयएमसी नवी दिल्ली आणि त्याच्या पाच प्रादेशिक शाखा - ढेंकनाल, आयझॉल, अमरावती, कोट्टायम आणि जम्मू- येथील विद्यार्थ्यांना या समारंभात त्यांच्या पदविका प्रदान केल्या जातील. याव्यतिरिक्त, 36 उत्कृष्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या विशेष शैक्षणिक कामगिरीबद्दल विविध पदक आणि रोख रकमेचे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल.
माध्यमे आणि संप्रेषण शिक्षणातील उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी IIMC ची असलेली वचनबद्धता अधोरेखित करत; यानिमित्ताने प्रतिष्ठित प्राध्यापक सदस्य आणि पाहुणे या महत्त्वाच्या समारंभात मंचावर एकत्र येतील.
आयआयएमसी माध्यम धुरीणांना आकार देत आहे:
आयआयएमसी ही भारतातील प्रमुख माध्यम प्रशिक्षण संस्था आहे; ज्याद्वारे माध्यम आणि संप्रेषण क्षेत्रातील शिक्षण दिले जाते.1965 मध्ये स्थापन झालेल्या IIMC मधे हिंदी पत्रकारिता, इंग्रजी पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्क, रेडिओ आणि टेलिव्हिजन पत्रकारिता, डिजिटल माध्यमे, ओडिया,मराठी,मल्याळम आणि उर्दू या भाषांतील पत्रकारिता या विषयांतील पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाते. याशिवाय, 2024 मध्ये विद्यापीठाला अभिमत (डीम्ड टू बी) विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर, या विद्यापीठाने माध्यमांसाठी उद्योग विषयक शिक्षण आणि स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन या विषयातील दोन पदव्युत्तर पदवी कार्यक्रम सुरू केले आहेत.
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107752)
Visitor Counter : 37
Read this release in:
Bengali
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam