पंतप्रधान कार्यालय
महाकुंभाच्या सांगतेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट
प्रविष्टि तिथि:
02 MAR 2025 8:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2025
प्रयागराज इथे संपन्न झालेल्या महाकुंभ मेळाव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट दिली.हे मंदिर कालातीत वारसा आणि आपल्या संस्कृतीचे धैर्य यांचे दर्शन घडवतेअसे त्यांनी म्हटले आहे.
या भेटीविषयी एक्स या समाजमाध्यमावर त्यांनी लिहीलेले संदेश :
प्रयागराज इथे आयोजित महाकुंभाची सांगता झाल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले असलेल्या सोमनाथला जायचे मी ठरवले होते.
आज, मी सोमनाथ मंदिरात प्रार्थना केल्यानंतर स्वतःला भाग्यवान समजतो. मी प्रत्येक भारतीयाच्या समृद्धीसाठी आणि निरामय आरोग्यासाठी प्रार्थना केली. हे मंदिर आपल्या संस्कृतीचा कालातीत वारसा आणि धैर्याचे प्रतीक आहे.
“प्रयागराजमधील एकतेचा महाकुंभ कोट्यवधी देशवासीयांच्या प्रयत्नांनी संपन्न झाला. मी एका भक्ताप्रमाणे मनःपूर्वक संकल्प केला होता की महाकुंभ संपन्न झाल्यानंतर, 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग असलेल्या श्री सोमनाथांची पूजा-अर्चा करेन.
आज,सोमनाथ दादांच्या आशीर्वादाने, तो संकल्प पूर्ण झाला आहे. सर्व देशवासीयांच्या वतीने, मी एकतेच्या या महाकुंभाची यशस्वी कामगिरी श्री सोमनाथ भगवानांच्या चरणी समर्पित केली. यावेळी,मी देशातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.”
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2107621)
आगंतुक पटल : 59
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam