माहिती आणि प्रसारण मंत्रालय
बॅटल ऑफ बँड्स ग्लोबल
जिथे विविध संस्कृतींमध्ये संघर्ष होतो, संगीत एकत्र आणते
Posted On:
28 FEB 2025 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2025
परिचय
द बॅटल ऑफ द बँड्सच्या घवघवीत यशानंतर, वेव्हज आता अभिमानाने बॅटल ऑफ द बँड्स ग्लोबल सादर करत आहे. हा रोमांचक नवीन उपक्रम मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आणि युवा पिढीला संगीताच्या समृद्ध सौंदर्य आणि विविधतेची ओळख करून देण्यासाठी तयार केला आहे. वेव्हजच्या पहिल्या पर्वातील क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा भाग म्हणून, प्रसार भारती आणि सारेगामा यांच्या सहकार्याने, हा कार्यक्रम सहभागी बँडना त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवण्यासाठी एक भव्य व्यासपीठ प्रदान करतो.
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) चे हे पहिले पर्व संपूर्ण माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या एकत्रीकरणासाठी सज्ज असलेले एक अनोखे केंद्र आणि बोलके व्यासपीठ आहे. जागतिक स्तरावर आयोजित हा एक प्रमुख कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश जागतिक माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचे लक्ष भारताकडे आकर्षित करणे आणि त्याला त्याच्या प्रतिभेसह भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी जोडणे हा आहे.

ही शिखर परिषद 1-4 मे , 2025 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स येथे होणार आहे. ब्रॉडकास्टिंग आणि इन्फोटेनमेंट, एव्हीजीसी-एक्सआर, डिजिटल मीडिया आणि इनोव्हेशन आणि फिल्म्स या चार प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित करून वेव्हज भारताच्या मनोरंजन उद्योगाचे भविष्य प्रदर्शित करण्यासाठी नेते, निर्माते आणि तंत्रज्ञांना एकत्र आणेल.
बॅटल ऑफ बँड्स ग्लोबल हा वेव्हजचा पहिला आधारस्तंभ आहे, जो ब्रॉडकास्टिंग आणि इन्फोटेनमेंटवर केंद्रित आहे. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा सर्जनशीलता आणि संगीताच्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्यासाठी तसेच उद्योगामध्ये समुदाय, नवोन्मेष आणि विकासाची भावना जोपासण्याच्या दृष्टीने तयार केली आहे.
पात्रता निकष
बॅटल ऑफ बँड्स ग्लोबलमध्ये सहभागी होण्यासाठी, कृपया तुम्ही खालील पात्रता निकष आणि सादरीकरण संबंधी मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण करत आहात याची खात्री करा:

सहभागाची प्रक्रिया
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बँड्सनी (गायकासह जास्तीतजास्त 5 सदस्य असलेल्या) त्यांच्या स्वतःच्या संगीताचे दर्शन घडवणारा मूळ दृक्श्राव्य कार्यक्रम दूरदर्शनच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून सादर केला पाहिजे. आधीच निर्माण झालेली गीते अथवा गीतरचना यांचा या कार्यक्रमात समावेश नसावा.

नोंदणीचे तपशील (बॅटल ऑफ बँड्स ग्लोबल)
- नोंदणी सुरु होण्याची तारीख: 15 फेब्रुवारी 2025
- नोंदणी बंद होण्याची तारीख: 10 मार्च 2025 (अंदाजे)
- प्रसारण सुरु होण्याची तारीख: 15 ते 20 मार्च
- प्रसारण बंद होण्याची तारीख: 30 एप्रिल 2025 पूर्वी
- संगीत महा अंतिम सोहळा: 1 मे ते 4 मे 2025
व्हिडिओ सादरीकरण:
- बँड्सनी आधुनिक संगीत आणि पारंपरिक लोकसंगीताचे घटक यांचा मिलाफ असलेल्या संगीताच्या अस्सल तुकड्याचा व्हिडिओ (जास्तीतास्त 2 मिनिटांचा, 300 एमबी, एमपी 4 स्वरूपातील) सादर करावा.
- दूरदर्शनच्या अधिकृत संकेतस्थळावर, “वेव्हज इंडिया” विभागात, “बॅटल ऑफ बँड्स” हे शीर्षक निवडून आणि नोंदणीसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करून हा व्हिडीओ अपलोड करावा.
नोंदणी:
- बँडचे नाव, शहर, संपर्काविषयी माहिती, बँडमधील सदस्य, समाज माध्यमांच्या लिंक्स तसेच कार्यक्रमाची लिंक यांसारख्या तपशीलासह नोंदणीअर्ज भरावा.
अटी:
- सादर करण्यात आलेला पहिला वैध व्हिडिओ निवड प्रक्रियेसाठी विचारात घेतला जाईल.
- या व्हिडिओतून मार्गदर्शक तत्वांचे पालन झाले पाहिजे; नियमांचे उल्लंघन केलेले अर्ज अपात्र ठरवण्यात येतील.
- माहिती सादर करून स्पर्धक प्रचारार्थ वापरासाठी गोपनीयतेचा हक्क सोडून देतात.
स्पर्धेचे तपशील
सखोल निवड प्रक्रीयेनंतर, सर्वोत्तम 13 आंतरराष्ट्रीय बँड्स 15 ते 20 मार्च दरम्यान प्रसारित होऊन 30 एप्रिल 2025 ला संपणाऱ्या या स्पर्धेत उतरतील.संपूर्ण कार्यक्रमातून सादर झालेल्या कार्यक्रमांच्या दर्जाच्या आधारावर 5 सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय बँड्सची निवड करण्यात येईल. हा कार्यक्रम:
निर्मिती : सारेगामा
दिग्दर्शन: ज्येष्ठ दिग्दर्शक श्रुती अनिन्दिता वर्मा
सूत्रसंचालन: प्रतिभावंत केतन सिंह
परीक्षक : सुप्रसिध्द कलाकार राजा हसन आणि श्रद्धा पंडित
मार्गदर्शक : आंतरराष्ट्रीय तज्ञता धारण करणारे टोनी कक्कड़, श्रुती पाठक, राधिका चोप्रा, अमिताभ वर्मा आणि इतर मान्यताप्राप्त भारतीय मार्गदर्शक
निष्कर्ष
बॅटल ऑफ बँड्स ग्लोबल ही स्पर्धा वैविध्यपूर्ण सांगीतिक प्रतिभा आणि आंतरराष्ट्रीय सहयोगासाठी मंच उपलब्ध करून देते. निवड झालेले सर्वोत्तम 5 आंतरराष्ट्रीय बँड्स, सर्वोत्तम 5 भारतीय बँड्ससह प्रतिष्ठित वेव्हज मंचावर कार्यक्रम सादर करताना जागतिक आणि भारतीय संगीतातील सर्वोत्तम कलाकृती पेश करतील. भारताच्या समृध्द सांगीतिक परंपरांचा उत्सव साजरा करतानाच जागतिक संगीत परिदृश्य उंचावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
संदर्भ
पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
S.Kakade/Sushma/Sanjana/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2107154)
Visitor Counter : 19