राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
मानवी हक्कांवर आधारित लघुपट निर्मितीसाठीच्या प्रतिष्ठित दहाव्या वार्षिक स्पर्धेच्या 7 विजेत्यांची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने केली घोषणा
Posted On:
27 FEB 2025 6:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2025
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने (एनएचआरसी) मानवी हक्कांशी संबंधित लघुपट निर्मितीसाठी 2024 मध्ये घेतलेल्या दहाव्या प्रतिष्ठित वार्षिक स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. आयोगाने ‘दूध गंगा – व्हॅलीज डाइंग लाईफ लाइन’’या लघुपटाला 2 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर केला आहे. विविध प्रकारच्या कचऱ्यामुळे दूध गंगा नदीच्या निर्मळ पाण्यात कशा प्रकारे प्रदूषण होत आहे आणि खोऱ्यातील लोकांच्या भल्यासाठी या नदीचा जीर्णोद्धार होणे कसे गरजेचे आहे याचे दर्शन जम्मू आणि काश्मीर मधील ईआर. अब्दुल रशीद भट यांच्या या माहितीपटातून घडते. इंग्लिश आणि इंग्रजी सबटायटल्ससह हिंदी आणि उर्दू या भाषांमध्ये हा चित्रपट तयार केला आहे.
आंध्रप्रदेशातील कडराप्पा राजू यांच्या ‘फाईट्स फॉर राईटस’ या लघुपटाला दीड लाख रुपयांचे दुसरे पारितोषिक मिळाले आहे.
तामिळनाडूच्या आर. रविचंद्रन यांनी निर्मिलेल्या ‘गॉड’ या लघुपटाने 1 लाख रुपयांचा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. हा मूकपट पिण्याच्या पाण्याचे महत्त्व लक्षात आणून देतो.
‘विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठीचे प्रमाणपत्र’ देण्यासाठी निवडण्यात आलेल्या चार लघुपटांना प्रत्येक 50,000 रुपयांचे रोख बक्षीस देखील देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.हे चित्रपट खालीलप्रमाणे आहेत:
1. तेलंगणा मधील हनीश उंद्रामत्ला यांचा ‘अक्षराभ्यासम’
2. तमिळनाडूतील एस. सेल्वम यांचा ‘विलयील्ला पट्टाथारी’(किफायतशीर पदवीधर)
3. आंध्रप्रदेशातील मदक वेंकट सत्यनारायण यांनी निर्मिलेला ‘लाईफ ऑफ सीता’
4. आंध्रप्रदेशातील लोट्ला नवीन यांचा ‘बी ए ह्युमन’
मानवी हक्कांना प्रोत्साहन आणि त्यांचे संरक्षण यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून त्यांचे चित्रपटीय आणि सर्जनशील प्रयत्नांची पोचपावती देण्याच्या उद्देशाने वर्ष 2015पासून एनएचआरसी लघुपट पारितोषिक योजना राबवण्यात येते. 2024 मध्ये या स्पर्धेचे दहावे वर्ष होते आणि यासाठी विहित कालमर्यादेत 303 अशा विक्रमी संख्येने प्रविशिका सादर झाल्या. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून विविध भारतीय भाषांमध्ये सादर झालेल्या या प्रवेशिकांची छाननी केल्यानंतर 243 प्रवेशिका पारितोषिकांसाठी स्पर्धेत होत्या. पारितोषिक वितरण समारंभ नंतरच्या काळात आयोजित केला जाईल.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2106683)