माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एएएआय ॲडस्पेंड ऑप्टिमाइझर हॅकेथॉन
Posted On:
25 FEB 2025 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2025
ॲडस्पेंड ऑप्टिमायझेशनसाठी स्मार्ट उपाय
ॲडस्पेंड ऑप्टिमाइझर हॅकेथॉन
वेव्ह्स क्रिएट इंडिया चॅलेंज सीझन 1 चा भाग असलेला ॲडस्पेंड ऑप्टिमाइझर हॅकेथॉन (AdSpend Optimizer Hackathon), ही उत्कंठा वर्धक स्पर्धा, पुर्वानुमानीत विश्लेषणाचा वापर करून ॲडस्पेंड ऑप्टिमायझेशनमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी उद्योग क्षेत्रातील तज्ञांना एकत्र आणते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया (एएएआय), म्हणजेच भारतीय जाहिरात संस्था संघटनेच्या सहयोगाने आयोजित केलेली ही हॅकेथॉन स्पर्धा, प्रमुख आव्हानांची हाताळणी करण्यासाठी, कौशल्याचे आदान-प्रदान करण्यासाठी आणि जाहिरात क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. आतापर्यंत एका आंतरराष्ट्रीय स्पर्धकासह 35 जणांनी नोंदणी केल्यामुळे स्पर्धेच्या तयारीला गती प्राप्त झाली आहे.

पहिली वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट, वेव्ह्स (WAVES), म्हणजेच जागतिक दृकश्राव्य आणि करमणूक परिषद हे संपूर्ण माध्यम आणि मनोरंजन (एम अँड ई) क्षेत्राच्या एकत्रीकरणासाठी सज्ज असलेले आगळे वेगळे केंद्र आणि विचार मांडण्यासाठीचे व्यासपीठ आहे. हा कार्यक्रम जागतिक स्तरावरील प्रमुख कार्यक्रम असून, जागतिक माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचे लक्ष भारताकडे वळवून, त्यांना इथली प्रतिभा आणि भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी जोडणे, हे याचे उद्दिष्ट आहे.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स येथे 1 ते 4 मे 2025 दरम्यान ही परिषद होणार आहे.
एएएआय ॲडस्पेंड ऑप्टिमाइझर हॅकेथॉन ब्रॉडकास्टिंग (प्रसारण) आणि इन्फोटेनमेंट (माहिती आणि मनोरंजन) स्तंभाचा एक भाग आहे. ही स्पर्धा जाहिरात ऑप्टिमायझेशनमधील कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी भारतातील आणि परदेशातील युवा जाहिरात आणि विपणन व्यावसायिकांना आमंत्रित करत आहे. स्पर्धक डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि सांख्यिकी मॉडेलिंगचा वापर करून, जाहिरातदारांना डेटा-आधारित निर्णय घेण्यासाठी, आरओआय जास्तीत जास्त करायला आणि विपणनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उपयोगी ठरणारे उपाय शोधतील
सहभागाचे निकष
एएएआय ॲडस्पेंड ऑप्टिमाइझर हॅकेथॉन, व्यावसायिकांना नवोन्मेशी जाहिरात रणनीती तयार करण्यासाठी आमंत्रित करते:

- डेटा सायन्स, मशीन लर्निंग, स्टॅटिस्टिक्स, सॉफ्टवेअर, विपणन आणि जाहिरात क्षेत्रातील कौशल्य असलेले स्पर्धक वैयक्तिकरित्या अथवा संघांत (जास्तीत जास्त 3 सदस्य) भाग घेऊ शकतील.
- जाहिरात संस्थांमधील (संपूर्ण सेवा, मीडिया, डिजिटल) व्यावसायिक अथवा कमीतकमी 1 वर्षाच्या अनुभवासह विपणन विभागातील व्यावसायिकांसाठी स्पर्धा खुली राहील.
- निर्धारित खर्चात ट्रिममास्टरच्या विपणन उद्दीष्टांची पूर्तता करण्यासाठी रणनीती विकसित करणे.
- स्पर्धकांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या स्वरूपात त्यांचे उपाय सादर करावेत.
ट्रिममास्टरच्या ब्रँड स्ट्रॅटेजीला आकार देणे:
स्पर्धक टॉप-फनेल विपणनाचे प्रयत्न वाढविण्यासाठी, "ट्रिममास्टर- मेल ग्रूमिंगसाठी ब्रँड स्ट्रॅटेजी वाढवणे" या उपायाचा वापर करू शकतील.
आव्हाने:
ट्रिममास्टरच्या विपणन संघाला टॉप-फनेल विपणन प्रयत्न करताना पुढील प्रमुख आव्हानांचा सामना करावा लागतो:
- प्रभावी अर्थसंकल्पीय तरतूद
- ब्रँड लिफ्ट प्रभाव जोखणे
- आरओआय चा जास्तीतजास्त वापर
- क्रॉस-चॅनेल सिनर्जी

उद्दिष्ट:
विविध मार्गांनी ऑप्टिमाइझ केलेल्या ॲडस्पेंड धोरणाद्वारे आपला विनाअनुदानित ब्रँड जागरूकता आकडा 52 वरून 75 पर्यंत वाढवणे, हे ट्रिममास्टरचे उद्दीष्ट असून, त्यामधून ब्रँड लिफ्ट आणि आरओआयवर मोजण्याजोगा प्रभाव सुनिश्चित होईल. यासाठी रु, 2,00,00,000/- (दोन कोटी) बजेट असेल.

ठळक मुद्दे:
मूल्यमापनाचे निकष
स्पर्धकांच्या ब्रँड धोरणांचे मूल्यांकन या प्रमुख मापदंडांच्या आधारे केले जाईल:

पारितोषिके
विजेत्या व्यक्ती आणि संघांना मिळणारे पारितोषिक
- सर्वोत्कृष्ट 3 स्पर्धक आपले उपाय वेव्ह्स कार्यक्रमात (तपशील जाहीर केले जातील) सादर करतील. त्यांच्या प्रवास खर्चाची प्रतिपूर्ती केली जाईल.
- अपवादात्मक सादरीकरणासाठी आकर्षक बक्षिसे.
- एएएआय द्वारे सर्वोत्तम 3 स्पर्धकांना भारतातील जाहिरात महोत्सव / परिषदांमध्ये भाग घेण्यासाठी नोंदणी खर्च दिला जाईल.
निष्कर्ष
वेव्ह्स क्रिएट इंडिया चॅलेंजचा भाग असलेली एएएआय ॲडस्पेंड ऑप्टिमाइझर हॅकेथॉन, ॲडस्पेंड ऑप्टिमाइझ करणे आणि ट्रिममास्टर बाबत ब्रँड जागरूकता वाढवणे, यासाठी नवोन्मेशी रणनीती विकसित करायला व्यावसायिकांना आमंत्रित करत आहे.
संदर्भ:
पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2106264)
Visitor Counter : 37