माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ट्रेलर निर्मिती स्पर्धेच्या माध्यमातून सर्जनशीलतेला प्रोत्साहन, नेटफ्लिक्सच्या विस्तृत आशय ग्रंथालयातून आकर्षक ट्रेलर बनवण्याची सर्जनशील निर्मात्यांना संधी


आकांक्षी निर्माते आणि व्यावसायिकांना 31 मार्च या अंतिम तारखेपर्यंत यामध्ये सहभागी होण्याची संधी, आतापर्यंत 3200 पेक्षा जास्त नोंदणीद्वारे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Posted On: 03 FEB 2025 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025

 

गेल्या आठवड्यात दिल्लीच्या गुरुतेग बहादूर फोर्थ सेंटेनरी इंजिनियरिंग कॉलेज (जीटीबी4सीईसी) मध्ये ट्रेलर निर्मिती स्पर्धा आकर्षणाचे केंद्र बनली. देशव्यापी ट्रेलर निर्मिती स्पर्धेच्या महाअंतिम फेरीपूर्वीच्या रोडशोंच्या मालिकेतला हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. भारतीय उद्योग महासंघ आणि रिस्किल यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि क्रिएटिव्ह पार्टनर नेटफ्लिक्स, शैक्षणिक भागीदार जीटीबी4सीईसी यांच्यासोबत आयोजित केलेल्या या उपक्रमात सहभागींना कथाकथनाच्या आणि व्हिडिओ एडिटिंगच्या कलेचा मागोवा घेण्याची असाधारण संधी उपलब्ध झाली.

सर्जनशीलता आणि नवोन्मेष

सर्जनशीलतेचा चालनाः वेव्हज 2025 चा एक भाग म्हणून नेटफ्लिक्स फंड फॉर  क्रिएटिव्ह इक्विटी पुरस्कृत ही ट्रेलर निर्मिती स्पर्धा आकांक्षी चित्रपटनिर्मात्यांना  प्रेरित करण्याच्या आणि सुसज्ज बनवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे.

या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नेटफ्लिक्सच्या विस्तृत आशय ग्रंथालयातील आशयसामग्रीवर आधारित आकर्षक ट्रेलर्स बनवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सहभागींना व्हिडिओ एडिटिंग, कथाकथन आणि ट्रेलर निर्मिती यांचे सखोल ज्ञान देण्याच्या उद्देशाने अतिशय बारकाईच्या 3 महिन्यांच्या सामूहिक उपक्रमांचाही यामध्ये  समावेश होता.

ट्रेलर मेकिंग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना  त्यांच्या कामगिरीच्या आधारे विविध सन्मान  आणि बक्षिसे मिळतील. वैध ट्रेलर सादर करणाऱ्या प्रत्येक सहभागीला सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल. अव्वल  50 स्पर्धकांना  फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की ) आणि नेटफ्लिक्स कडून विशेष दखल बरोबरच  उत्कृष्टता प्रमाणपत्र मिळेल.

तसेच अव्वल 20 स्पर्धकांना ट्रॉफी, विशेष भेट आणि वेव्ह्ज मध्ये उपस्थित राहण्याची, त्यांची कामगिरी प्रदर्शित करण्याची आणि उद्योजकांना भेटण्याची अनोखी संधी मिळेल.

यासाठी नोंदणी सुरु असून 31 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे. आतापर्यंत जगभरातून सुमारे 3200 जणांनी नोंदणी केली आहे.  सहभागींमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून म्हणजे महत्त्वाकांक्षी आशय  निर्माते आणि व्हिडिओ एडिटर्स पासून  ते आपला छंद जोपासणारे व्यावसायिक  किंवा संकलक आणि निर्माते म्हणून त्यांच्या सध्याच्या उपक्रमाचा वापर करणारे यांचा समावेश आहे.

नोंदणीसाठी लिंक: https://reskilll.com/hack/wavesficci/signup

पुढील वाटचाल

ट्रेलर मेकिंग स्पर्धा आणि त्याच्या रोड शो चा उद्देश चित्रपट निर्माते आणि कथाकारांच्या पुढच्या पिढीची चाचपणी करणे  आणि त्यांना मार्गदर्शन  करणे हा आहे. स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर, हे सहभागी आता वेव्हस शिखर परिषद  दरम्यानच्या महाअंतिम फेरीमध्ये  प्रतिष्ठित पुरस्कार आणि उद्योग जगताचे लक्ष वेधून घेण्यासाठी  स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

दिल्ली रोड शो हा कथाकथन आणि व्हिडिओ एडिटिंगच्या  परिवर्तनीय सामर्थ्याचा दाखला  होता, ज्याने या देशव्यापी स्पर्धेच्या रोमांचक समारोपाचा मंच तयार केला.

 

* * *

S.Kakade/Shailesh/Sushma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2099338) Visitor Counter : 14