माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आगामी जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद म्हणजे भारताच्या सर्जनशील शक्तीचे दर्शन घडवत जगासमोर आपली एक नवीन ओळख निर्माण करण्यासाठी नामी संधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘वेव्हज’ सारख्या कार्यक्रमांमुळे फक्त महसूल निर्माण होत नाही , तर धारणा विकसित होण्यास मदत होते; सर्जनशील प्रतिभेच्या वापरामुळे राज्यांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन मिळते - पंतप्रधानांचे उत्कर्ष ओडिशा - मेक इन ओडिशा परिषदेत प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
28 JAN 2025 7:35PM
|
Location:
PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025
आगामी वेव्हज (जागतिक ऑडिओ व्हिज्युअल म्हणजेच दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद) भारताच्या सर्जनशील कौशल्याला एक नवीन जागतिक ओळख प्रदान करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. भुवनेश्वर येथील उत्कर्ष ओडिशा - मेक इन ओडिशा परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या प्रतिनिधींना संबोधित करताना त्यांनी अधोरेखित केले की,‘वेव्हज’ सारख्या प्रमुख कार्यक्रमांमुळे केवळ लक्षणीय महसूलच निर्माण होत नाही तर धारणा निर्माण होतात आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते. भारतामध्ये असलेल्या सर्जनशील प्रतिभेच्या विशाल साठ्याचे जगापुढे प्रदर्शन करण्यासाठी तसेच प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात देशाला जागतिक नेता म्हणून स्थान मिळवण्याची अशा उपक्रमांमध्ये अफाट क्षमता असते, यावर त्यांनी भर दिला.

क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत तीन नवीन आव्हाने
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत तीन नवीन आव्हानांचा प्रारंभ , उदा. " रेसोनेट: द ईडीएम चॅलेंज", "मेक द वर्ल्ड वेअर खादी" आणि "वाह उस्ताद".
1. वाह उस्ताद
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची कल्पना तसेच सांस्कृतिक मंत्रालय आणि दूरदर्शनच्या सहकार्याने प्रतिष्ठित "दिल्ली घराणा" द्वारे संचालित, "वाह उस्ताद" हे आव्हान युवा, शास्त्रीय शिक्षण घेतलेल्या गायकांना त्यांचे असाधारण कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो. हे आव्हान आंतरराष्ट्रीय सहभागींसह 18 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील सहभागींसाठी खुले आहे. ही दोन-टप्प्यांमधील स्पर्धा असून वेव्हज 2025 मधील महा राष्ट्रीय अंतिम फेरीत त्याची सांगता होणार असून यासाठीची नोंदणी आज प्रसार भारतीच्या (https://prasarbharati.gov.in/wah-ustad/) संकेतस्थळावर सुरु करण्यात आली आहे.
2. "मेक द वर्ल्ड वेअर खादी"
हे आव्हान जाहिरात व्यावसायिक आणि फ्रीलान्सर्सना खादीला जागतिक ब्रँड म्हणून प्रस्थापित करणाऱ्या अभिनव मोहिमा विकसित करण्यासाठी आमंत्रित करते. आंतरराष्ट्रीय सहभागासाठी हे आव्हान खुले असून याचा उद्देश खादीचा भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करणे हा आहे. सहभागींना विविध स्वरूपांमध्ये (उदा., डिजिटल, प्रिंट, व्हिडिओ, अनुभवात्मक) नाविन्यपूर्ण डिझाइन संकल्पना शोधायच्या आहेत. खादीची ब्रँड प्रतिमा उंचावण्यासाठी आणि ग्राहकांच्या सहभागाला चालना देण्यासाठी "मेक द वर्ल्ड वेअर खादी" हे आव्हान सर्जनशील विचार आणि धोरणात्मक दृष्टिकोनांना प्रोत्साहन देते.
3. रेसोनेट: द ईडीएम चॅलेंज: इंडियन म्युझिक असोसिएशन द्वारे आयोजित रेझोनेट हे आव्हान जगभरातील कलाकार, गीतकार , संगीतकार आणि कलाकारांना इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (ईडीएम ) निर्मितीमध्ये त्यांची असाधारण प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करते. हे आव्हान सर्व देशांसाठी खुले आहे.

N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
रिलीज़ आईडी:
2097134
| Visitor Counter:
105