पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2025 12:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या आजच्या पराक्रम दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नेताजींचे योगदान अतुलनीय होते आणि धैर्य व खंबीरतेचे प्रतीक ते होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X वरील वेगवेगळ्या पोस्टमध्ये म्हटले आहे :
“आज पराक्रम दिनानिमित्त, मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहतो. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे. ते धैर्य आणि खंबीरतेचे प्रतीक होते. त्यांच्या संकल्पनेतील भारताच्या उभारणीसाठी काम करताना त्यांचे विचार आपल्याला कायम प्रेरणा देतात.”
“आज सकाळी 11:25 च्या सुमारास, पराक्रम दिनानिमित्त कार्यक्रमात माझे विचार मी मांडेन. हा दिवस आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आव्हानांवर मात करण्यासाठी सुभाषबाबूंसारखे साहस अंगी बाणवण्यासाठी प्रेरित करो.”
* * *
JPS/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2095376)
आगंतुक पटल : 77
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam