पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
20 JAN 2025 10:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 20 जानेवारी 2025
अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंध बळकट करण्यासाठी आणि जगाचे चांगले भविष्य घडवण्यात सहयोगासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत मिळून काम करण्याची उत्सुकता पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आगामी यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले:
“अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ऐतिहासिक शपथविधी झाल्याबद्दल माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष @realDonaldTrump अभिनंदन! आपल्या दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगाचे चांगले भविष्य घडवण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र मिळून काम करण्यास उत्सुक आहे. आगामी यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा!”
S.Kane/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2094731)
Visitor Counter : 20
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam