गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) 20 व्या स्थापना दिनानिमित्त आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथे झालेल्या सोहळ्याला केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती


अमित शाह यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे (NIDM) दक्षिण विभागीय राष्ट्रीय केंद्र, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची दहावी बटालियन आणि सुपौल केंद्रातील प्रादेशिक प्रतिसाद केंद्रासह 220 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

Posted On: 19 JAN 2025 6:01PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचा (NDRF) 20 वा स्थापना दिन सोहळा आज  आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथे झाला. केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी 220 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि भूमिपूजन केले. यात आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या (NIDM) दक्षिण विभागीय राष्ट्रीय केंद्र, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची दहावी बटालियन आणि सुपौल केंद्रातील प्रादेशिक प्रतिसाद केंद्राचा समावेश आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलिस अकादमीतील नव्या एकात्मिक गोळीबार सराव सुविधेची पायाभरणी केली तसेच, तिरुपती येथील प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या इमारतीचे उद्घाटनही केले.

IMG_1757.JPG

यावेळी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी उपस्थितांना संबोधितही केले. जेव्हा नैसर्गिक आपत्ती उद्भवते तेव्हा राष्ट्रीय आपत्ती निवारण दल मदतीला धावून येते आणि मानवनिर्मित आपत्ती आली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार मदतीला धावून येते असे अमित शाह यावेळी म्हणाले. 2014 ते 2019 या पाच वर्षांत मानवनिर्मित आपत्तींचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका बसला आहे, आणि त्यामुळे राज्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे असे त्यांनी सांगितले.

CR3_5688.JPG

CR3_5705.JPG

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवरही अत्यंत कमी कालावधीत स्वतःची एक विश्वासार्ह संस्था म्हणून ओळख प्रस्थापित केली आहे असे अमित शाह म्हणाले.  आपत्तीच्या वेळी जेव्हा राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान येतात त्यानेळी लोकांना आपण सुरक्षित असल्याची खात्री वाटते अशा शब्दांत शाह यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या कार्याचा गौरव केला. गेल्या दोन वर्षांत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने दोन मोठ्या वादळांमध्ये शून्य जीवितहानीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या साध्य केल्याची कामगिरी त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. नेपाळ, इंडोनेशिया, तुर्कस्तान, म्यानमार, व्हिएतनाम या आणि इतर देशांनी तसेच त्यांच्या वेळोवेळीच्या प्रमुखांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे प्रयत्न आणि कामगिरीची मोठ्या प्रमाणावर दखल घेत प्रशंसा केली असल्याची बाबही अमित शाह यांनी अधोरेखित केली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करत, आज आपत्ती व्यवस्थापनात भारत जागतिक स्तरावर आघाडीवरचा देश  बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे ते म्हणाले.

IMG_1729.JPG

IMG_1753.JPG

***

S.Patil/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2094390) Visitor Counter : 24