गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गुजरातमधील वडनगर इथल्या अत्याधुनिक पुरातत्त्व अनुभवात्मक संग्रहालयाचे व वडनगर क्रीडा संकुलाचे उद्घाटन

Posted On: 16 JAN 2025 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधील वडनगर इथे अत्याधुनिक पुरातत्त्व अनुभवात्मक संग्रहालय, प्रेरणा कॉम्प्लेक्स व वडनगर क्रीडा संकुलाचे उद्घाटन केले. अमित शहा वडनगर इथल्या पारसा संकुल विकास आराखडा, नागरी रस्ते विकास व सौंदर्यीकरण कार्यक्रमांच्या देखील अध्यक्षस्थानी होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासावरील फिल्म प्रदर्शित करण्यात आली. या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  

आपल्या भाषणात केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा म्हणाले, आज संपूर्ण जग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत आहे आणि हा कार्यक्रम मोदी यांच्या जन्मगावी होत आहे. ते म्हणाले की हा कार्यक्रम अनेक अर्थांनी उल्लेखनीय आहे कारण यामुळे देशाच्या आणि जगाच्या नकाशावर वडनगरचे नांव ठळकपणे उठून दिसेल. ते पुढे म्हणाले की वडनगर हे जगातल्या सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. या शहराची अखंडता व चैतन्य यांचा प्रभाव प्रत्येक कालखंडाच्या संस्कृती आणि परंपरेवर दिसून येतो. ते म्हणाले की, वडनगर हजारो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे आणि हे नगर 2500 वर्षांपेक्षा जास्त प्राचीन असल्याचे पुराव्यांवरुन दिसून येते.  

अमित शहा म्हणाले की, लोकांनी या पुरातत्त्व अनुभवात्मक संग्रहालय व उत्खनन संकुलाला आवर्जून भेट द्यावी कारण इतिहास व उत्खनन अनोख्या पद्धतीने एकाच ठिकाणी असणारे जगात असे दुसरे कुठलेच संग्रहालय नाही. या संग्रहालयाच्या उभारणीसाठी सुमारे 300 कोटी रुपये खर्च झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून आकाराला आलेल्या या संग्रहालयामुळे केवळ वडनगरच नाही तर गुजरातची, देशाची संस्कृती जगासमोर सादर झाली आहे. ते म्हणाले की, संग्रहालयाच्या निर्मात्यांनी संग्रहालयाच्या इमारतीत व उत्खनन केंद्रात 2500 वर्षांपेक्षा जास्त जुना असलेल्या वडनगरच्या प्रवासाला मूर्त रुप दिले आहे. या संग्रहालयातून वडनगरच्या इतिहासाचे दर्शन घडण्याबरोबरच इथली संस्कृती, व्यापार, नगररचना, शिक्षण आणि प्रशासन यांचे विविध कालखंडामधले योगदान अधोरेखित होते.


S.Patil/S.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2093614) Visitor Counter : 12