पंतप्रधान कार्यालय
आमचे सरकार भाविकांसाठी तीर्थयात्रेचा उत्तम अनुभव सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे : पंतप्रधान
Posted On:
13 JAN 2025 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे हज आणि उमरा मंत्री तौफिक बिन फवजान अल-रबिया यांच्यासमवेत करण्यात आलेल्या हज करार 2025 चे स्वागत केले आहे. हा करार भारतातील हज यात्रेकरूंसाठी चांगली बातमी आहे, असे मोदी म्हणाले. "आमचे सरकार भाविकांसाठी तीर्थयात्रेचा उत्तम अनुभव सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे", असे पंतप्रधान म्हणाले.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या एक्स वरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी पोस्ट केले:
"मी या कराराचे स्वागत करतो,ही भारतातील हज यात्रेकरूंसाठी चांगली बातमी आहे.आमचे सरकार भाविकांसाठी तीर्थयात्रेचा उत्तम अनुभव सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे."
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2092640)
Visitor Counter : 22