पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उद्योजक निखील यांच्यासमवेत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मराठीतील अनुवाद

Posted On: 10 JAN 2025 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 10 जानेवारी 2025

पंतप्रधान: आतापर्यंत तुम्ही किती पॉडकास्ट पोस्ट केले आहेत?

निखिल कामत – 25 सर.

प्रधानमंत्री - 25

निखिल कामत - हो, पण आम्ही महिन्यातून एकच रात्र करतो !

पंतप्रधान : अच्छा.

निखिल कामत – दर महिन्याला मी एक दिवस एक पॉडकास्ट करतो  आणि उरलेला महिना काहीच करत नाही.

पंतप्रधान : बघा, ज्याला/जिच्यासोबत करायचे आहे त्याला /तिला 1 महिन्यापर्यंतचा वेळ दिल्याने ती व्यक्ती बऱ्याच अंशी दडपणातून बाहेर येते.

निखिल कामत - बरोबर सर, अगदी सखोलपणे करतोआम्ही केलेले बहुतांश पॉडकास्ट तसेच आहेत. हे उद्योजगतेशी संबंधित आहेत , आमचे जे प्रेक्षक आहेत, ते 15 – 40 या वर्गात येणारे लोक आहेत, जे प्रथमच उद्योजकतेच्या क्षेत्रात सुरुवात करणार आहेत, मग आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल एक एपिसोडमेटाबद्दल एक एपिसोडफार्मास्युटिकल गोष्टींबद्दल अशा खूपच विशिष्ट विषयांवर करतो. आणि आणखी एक गोष्ट आम्ही नुकतीच सुरु केली आहे ‘पीपल people’ ,यामध्ये आम्ही बिल गेट्ससारख्या काही लोकांशी बोललो आहोत but again very specific to the industry they belong to.

 

पंतप्रधान : पहिली गोष्ट म्हणजे असा हा पॉडकास्ट माझ्यासाठी पहिल्यांदाच होत आहे आणि म्हणूनच माझ्यासाठीही हे जग पूर्णपणे नवीन आहे.

निखिल कामत – तर सर मला माफ करा, जर माझी हिंदी फारशी चांगली नसेल तर, मी दक्षिण भारतीय आहे, मी बहुतेक काळ बंगलोरमध्ये राहिलो वाढलो आहे आणि तिथले लोक, माझ्या आईचे शहर म्हैसूर आहे, तर तिथे लोक कन्नड जास्त बोलतात आणि माझे वडील मंगळुरूजवळचे होते, हिंदी मी शाळेत शिकलो आहे,  but fluency च्या बाबतीत फारशी चांगली नाही आहे, आणि लोक म्हणतात की बहुतेक संवाद नॉन-व्हर्बल होत असतो, जे लोकांना एकमेकांकडे बघून समजतं! I think we should be fine.,

पंतप्रधान : बघा, मीही हिंदी भाषक नाही, आपल्या दोघांचे असेच चालणार आहे.

निखिल कामत – आणि आमचा हा एक पॉडकास्ट पारंपारिक मुलाखतीसारखा नाही, मी पत्रकार नाही, आम्ही बहुतेक अशा लोकांशी बोलतो जे पहिल्यांदाच उद्योजकतेच्या क्षेत्रात येऊ इच्छितात. म्हणून आम्ही त्यांना सांगतो की उद्योग क्षेत्रात उद्योजक होण्यासाठी काय आवश्यक आहे, पहिल्यांदा निधी कोठून मिळेल, त्यांना शिकण्यासाठी साहित्य कोठून मिळेल ऑनलाइनमधूनतर आम्ही त्या झोनमधले  आहोत and along the way today आपण  we will try to drop parallel between politics and entrepreneurship. कारण मला असं वाटत आलं आहे की या दोघांपैकी अनेक साम्य आहे, ज्याबद्दल आजपर्यंत कोणी बोललं नाही. तर we will take that direction. त्यामुळे तुम्हाला हवं असेल की या पॉडकास्टमधील काही प्रश्न स्वत: विचारावे, माझ्याकडे काही चांगली answers नाहीत. पण तुम्ही विचारू शकता. या पॉडकास्टमध्ये मला पहिली गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आपल्या आयुष्याचा पहिला भाग. पंतप्रधान होण्याआधी मुख्यमंत्री होण्याआधी, तुमचा जन्म कुठे झाला होत , पहिल्या 10 वर्षांत तुम्ही काय केले. If you can throw some light on the first era of your life.

पंतप्रधान : बघा, तसं तर सगळ्यांना माहित आहे की माझा जन्म गुजरातमधला, उत्तर गुजरातच्या मेहसाणा जिल्हा तिथे वडनगर एक छोटंसं शहर आहे. आम्ही लहान होतो तेव्हा बहुधा 15,000 इतकीच लोकसंख्या होतीहे मला अंधुकसे आठवते. मी तिथून येतो. पण मग जसं प्रत्येकाचं स्वतःचं गाव असतं, तसंच माझं एक गाव होतं, माझं गाव एका अर्थाने गायकवाड संस्थान होतं. तर गायकवाड संस्थानाचे एक वैशिष्ट्य होते. प्रत्येक गावात शिक्षणाच्या बाबतीत प्रचंड आग्रह असायचा. एक तलाव होता, टपाल कार्यालय होतं, ग्रंथालय होतं, अशा चार-पाच गोष्टी म्हणजे गायकवाड संस्थानाचे गाव आहे. तर हे असणारच आहे, ती त्यांची व्यवस्था होती. तर मी गायकवाड संस्थानातील जी प्राथमिक शाळा होती, तिथेच शिकलो होतो, तर तशा अर्थाने लहानपणी मी तिथेच राहात होतो.  तलाव होता म्हणून पोहायला शिकलो तिथे, माझ्या कुटुंबाचे सर्व कपडे मी धुत असे, त्यामुळे मला तलावात जाण्याची परवानगी मिळत होती. नंतर तिथे एक भागवत आचार्य नारायण आचार्य हायस्कूल होते, बीएनए स्कूल. ते पण एक प्रकारे धर्मादाय संस्थाच होते, ही जशी आजच्या काळातली शिक्षणाबद्दलची परिस्थिती आहे तशी नसायची. त्यामुळे माझं, शालेय शिक्षण, माझं तिथेच झालं. त्या काळी हे 10+2 नव्हते, तर अकरावीचीचा वर्ग असायचा. मी कुठे तरी वाचलं होतं  चिनी तत्ववेत्ता  झुआनझांग ते माझ्या गावात राहात होते, तर त्यांच्यावर एक सिनेमा बनवला जाणार होता, तर त्यावेळी मी कदाचित त्यांच्या इथे दूतावासाला किंवा त्या वेळी कुणाला तरी पत्र लिहिले होते की मी कुठेतरी वाचले आहे की तुम्ही  झुआनझांग यांच्यासाठी चित्रपट बनवत आहात तर त्याचाही उल्लेख करावा कुठेतरी, अशा तऱ्हेचे मी काही प्रयत्न केले होते. ही अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

त्याआधी माझ्या गावात एक रसिक भाई दवे नावाचे  नेते होते, ते काँग्रेसचे नेते होते, तेही थोडे समाजवादी विचारसरणीचे होते आणि ते मूळचे सौराष्ट्राचे होते आणि माझ्या गावी स्थायिक झाले होते. ते आम्हा शाळकरी मुलांना सांगायचे  की बघा भावांनो तुम्ही कुठेही गेलात आणि तुम्हाला कोणताही एखादा दगड सापडला ज्यावर काही लिहिलं असेल किंवा त्यावर काही कोरलेलं असेल तर ती दगडं गोळा करून शाळेच्या या कोपऱ्यात फेकून द्या. हळूहळू तिथे एक मोठा ढिगारा बनला होता, मग मला समजले की त्यांचा हेतू असा होता की हे एक अतिशय प्राचीन गाव आहे, तर इथल्या प्रत्येक दगडात काही ना काही कथा आहे. गोळा करा, जेव्हा एखादी व्यक्ती येईल तेव्हा तो ते करेल. कदाचित ही एक कल्पना असावी. त्यामुळे त्याकडेही माझे लक्ष वेधले गेले. मी 2014 मध्ये पंतप्रधान झालो तेव्हा स्वाभाविकपणे जगातील नेते एक कर्टसी कॉल करतात, तर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग , त्यांचा कर्टसी कॉल आला शुभेच्छा वगैरे वगेरे गप्पा झाल्या, मग ते स्वत: म्हणाले की मला भारतात यायचे आहे. मी म्हणालो नक्की या तुमचे स्वागत आहे, तुम्ही नक्की याच, तर म्हणाले मला गुजरातला जायचे आहे. मी म्हणालो हे तर आणखी चांगलं आहे. तर ते म्हणाले की मला तुमच्या गावी वडनगरला जायचे आहे. मी म्हणालो, क्या बात है तुम्ही इथपर्यंतच्या कार्यक्रमाची आखणी केली आहे, ते म्हणाला, का ते तुम्हाला माहित आहे का, मी म्हणालो नाही मला माहित नाहीते म्हणाले, "तुमचे आणि माझे खास नाते आहे. मी म्हणालो कायझुआनझांग हा जो चिनी तत्त्वज्ञ होता, तो सर्वात जास्त काळ तुमच्याच गावात राहिला होता, पण जेव्हा तो चीनला परत आला तेव्हा तो माझ्या गावातच राहत होता. तर म्हणाले आपल्या दोघांमधले हेच नाते आहे.

निखिल कामत – आणि जर तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या आणखी गोष्टी आठवत असतील तर, जेव्हा तुम्ही लहान होता, तुम्ही हुशार विद्यार्थी होता का, तुमच्या आवडी-निवडी काय होत्या त्यावेळी.

पंतप्रधान : मी अतिशय सामान्य विद्यार्थी होतो,मी काही कोणीही माझ्याकडे आवर्जून लक्ष देईल असा काही नव्हतो, पण माझे एक शिक्षक होते वेलजीभाई चौधरी नावाचे, त्यांना माझ्याबद्दल खूप जिव्हाळा होता, तर एके दिवशी ते माझ्या वडिलांना भेटायला गेले. माझे वडील मला सांगत होते की याच्यामध्ये खूप टॅलेंट आहे, पण तो एकाग्रता मात्र दाखवत नाही, हा असाच आहे, अनेक प्रकारच्या गोष्टी करत राहतोतर म्हणाले की सर्व काही इतक्या पटकन grap  करतो, पण मग स्वतःच्याच जगात हरवून जातो, तर वेलजी भाईंच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, माझ्या वेलजीभाई चौधरींच्या, तर माझ्या शिक्षकांचं माझ्यावर खूप प्रेम होतं, पण मला जास्त अभ्यास करायचा होता, पण जर का त्यात स्पर्धात्मक बाब असेल तर कदाचित मी त्यापासून पळून जायचो. मला त्यात कसलाही रस नव्हता, अशीच परीक्षा पास करा भाऊ, हातावेगळे करून टाका, असं असायचं, पण अवांतर उपक्रम मी बरेच करत असे. काही नवीन असेल तर लगेच ती आत्मसात करणे हा माझा स्वभाव होता.

निखिल कामत - सर, तुमचे लहानपणीचे काही असे मित्र आहेत का जे अजूनही तुमच्या संपर्कात आहेत?

पंतप्रधान – असं आहे की माझं प्रकरण थोडं विचित्र आहे, अगदी लहान वयात मी घर सोडलं, मी घर सोडलं म्हणजे मी सगळं सोडून गेलो, माझा कोणाशीही संपर्क नव्हता, त्यामुळे खूप अंतर पडलं होतं, त्यामुळे माझा काही संपर्क नव्हताकशाशी काही देणं घेणंही नाही, त्यामुळे माझं आयुष्यही एका अनोळखी भटक्या माणसाचं होतं, तर मला विचारेल कोण. तर माझं आयुष्य तसं नव्हतं, पण जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या मनात काही इच्छा निर्माण झाल्या. एक अशी इच्छा निर्माण झाली की, माझ्या वर्गातील जितके मित्र आहेत जुने, सगळ्यांना मी मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून घेईन,. त्यामागचं माझं मानसशास्त्र असं होतं की, माझ्या कुठल्याही माणसाला असे वाटू नये की आपण मोठे तीस मार खान झालो आहोत. मी तोच आहे जो अनेक वर्षांपूर्वी गाव सोडून गेला होता, माझ्यात कोणतेही बदलल झालेले नाहीत, मला ते क्षण जगायचे होते आणि जगण्याचा मार्ग म्हणजे मी त्या सहकाऱ्यांसोबत बसेन. पण त्यांना चेहऱ्यावरूनही मी ओळखू शकत नव्हतो, कारण मधे खूप अंतर लोटलं होतं, केस पांढरे झाले होते, मुलं मोठी झाली होती सर्व, पण मी सगळ्यांना बोलावलं, कदाचित 30-35 लोक जमले असतील आणि आम्ही रात्री जेवण केलं, गप्पा मारल्या, लहानपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, पण मला मात्र फारसा आनंदी वाटलं नाही. आनंद याच्यासाठी नाही आला की, मी मित्र शोधत होतो, पण त्यांना मात्र मुख्यमंत्रीच दिसत होता. त्यामुळे ती दरी काही मिटली नाही, आणि कदाचित मला तु असं एकेरी म्हणणारे  माझ्या आयुष्यात कोणीच उरलेलं नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. आहेत सगळे, अजूनही संपर्कात आहेत पण मोठ्या आदराने माझ्य कडे  ते लोक बघत राहतात. तर एक गोष्ट आहे, एक शिक्षक होते माझे रासबिहारी मनिहार, त्याचे नुकतेच निधन झाले, काही काळापूर्वीच, आणि ते जवळ जवळ 93-94 वर्षांचे होते. ते मला पत्र नेहमी लिहित असत, त्यात ते माझ्यासाठी तु असे लिहित, बाकी तरमाझी  एक इच्छा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा होती की, मी माझ्या शाळेतील मित्रांना बोलावावे, मी  बोलावून बघितलं.

दुसरी माझी इच्छा होती जी कदाचित भारतातील लोकांना विचित्र वाटेल, मला वाटायचे की मी माझ्या सर्व शिक्षकांचा सार्वजनिकरित्या सन्मान करीन, म्हणून मला लहानपणापासून ज्यांनी शिकवले आहे, आणि शालेय शिक्षणापर्यंत जे माझे सर्व शिक्षक होते, त्या सगळ्यांना शोधलं आणि त्यांचा सार्वजनिकरित्या खूप मोठा सन्मान केला, आणि आमचे राज्यपाल साहेब होते शर्मा जी. तेही त्या कार्यक्रमाला आले होते आणि मी, एक संदेश माझ्या मनात होता की, मी जो कोणी असेन तरी यांचाही काहीएक वाटा आहे मला घडवण्यामध्ये काही माझ्या बालमंदिराचे शिक्षक होते, काही सर्वात ज्येष्ठ शिक्षक 93 वर्षांचे होते. जवळपास 30-32 शिक्षकांना बोलावले होते आणि मी त्या सर्वांचा मी जाहीर सत्कार केला होता आणि ते माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होते, मी मनात विचार करत नाही, मग मी एक दिवस माझ्या आयुष्यात केले, माझे ते मोठे कुटुंब होते, माझे भाऊ, त्यांची मुले, बहीण, त्यांची मुले, जे कोणी कुटुंबातील सदस्य, कारण त्यांनाही ओळखत नव्हतो, कारण मी सोडून दिले होते. पण एक दिवस मी सगळ्यांना माझ्या सीएम हाऊसवर बोलावले. सर्व कुटुंबातील सदस्यांची ओळख करून घेतली मी, की हा कोणाचा मुलगा आहे, कोणाचे लग्न कुणाशी  झाले आहे, कारण माझे तर काही नाते राहीले नव्हते. तिसरी गोष्ट मी ही केली. चौथी मी जेव्हा संघाच्या कार्यात मी होतो. तर सुरवातीला ज्या कुटुंबांमध्ये मला जेवण मिळायचे, जेवायला जायचो, अशी अनेक कुटुंबे होती ज्यांनी मला खाऊ पिऊ घातले, कारण आयुष्यभर तर माझी स्वतःची खाण्याची सोय नव्हती, असेच मी खात असे. तर त्या सर्वांना मी बोलावले होते, तर ज्याला म्हणाल मी माझ्या मर्जीनुसार काही गोष्टी केल्या की, इतकी, गेली 25 वर्षे झाली मला, तर या चार गोष्टी केल्या. मी माझ्या शाळेतील मित्रांना बोलावले, मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना बोलावले, आणि मी माझ्या शिक्षकांना बोलावले.

निखिल कामत - तुम्हाला कदाचित आठवत नसेल काही वर्षांपूर्वी बंगळुरूला आला होतातस्टार्टअप्समधील लोकांना भेटत होतात आणि  ती तुमची त्या रात्रीची शेवटची बैठक होती जेव्हा तुम्ही मला भेटला होतात आणि त्यांनी सांगितले होते की आमच्याकडे तुम्हाला भेटण्यासाठी केवळ 15 मिनिटे आहेत. मात्र आपण  आमच्याबरोबर एक तास बसला होतात, आणि तुम्हाला जर आठवत असले तर तेव्हाही मी तुम्हाला प्रश्नच विचारत होतो!

मला वाटते की उत्तर देण्यापेक्षा प्रश्न विचारणे सोपे आहे ,आणि मी तुम्हाला असे देखील काहीतरी सांगत होतो की हे जे घडतंय ते कदाचित चांगलं नाहीये, ते जे घडतंय ते कदाचित चांगलं नाही आहे आणि तुम्ही ऐकत होतात.

जर तुम्हाला   विचारले की समाजात असे कुठले  विशिष्ट प्रकारचे आणि काही विशिष्ट वयोगटातील लोक आहेत ज्यांच्याशी तुमचे खूप घनिष्ट संबंध आहेत , जर तुम्ही एक वयोगट निश्चित  करू शकलात  तर तो कोणता असेल ?

पंतप्रधान  – तर माझ्या बाबतीत अनेकदा असे म्हटले जायचे की नरेंद्र भाईला शोधायचे असेल तर कुठे शोधायचे , 15-20 मुलांबरोबर गप्पा, हास्यविनोद करत उभा असेल . तर तशीही प्रतिमा होती माझी, म्हणूनच कदाचित आज मला प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक वयोगटापासून अलिप्त आहोत असे जाणवत नाही , कनेक्ट हा शब्द कदाचित तेवढे बरोबर उत्तर यावर माझे नसेलमात्र त्यांच्यात आणि माझ्यात अंतर आहे असे मला जाणवत नाही.

निखिल कामथ  – जसे तुम्ही म्हणत होतात  की तुम्हाला स्पर्धा आवडत नाही, जिद्दू कृष्णमूर्ती यांच्यासारखे लोक, अनेक  प्रगल्भ विचारवंत आहेत, त्यांचे मत आहे की स्पर्धा चांगली नाही. त्या विचारसरणीतून राजकारणात आलेली एखादी व्यक्ती, जिथे प्रचंड स्पर्धा आहे ,ती  राजकारणात तशी विचारसरणी कशी आणू शकते ?

पंतप्रधान  – हे बघा, लहानपणी स्पर्धा नसेल तर तो आळशीपणा असेल. कुठले मोठे तत्वज्ञान वगैरे काही नसेल.  मुलांचे जे बेजबाबदार वागणे असते तसेच माझे असेल. मला नाही वाटत कुठले तरी तत्त्वज्ञान मला मार्गदर्शन करत असावे.  मला वाटायचे  ठीक आहे , तो आणखी जास्त गुण  मिळवेल, मी स्वतःहून जास्त का मिळवू ? दुसरे म्हणजे, मी जरा खोडकर होतो, त्यावेळी जे वाटेल ते करायचो , त्यामुळे असे समजा की अशी काही स्पर्धा असेल तर मी त्यात उतरेन, नाट्य  स्पर्धा असेल तर मी त्यात भाग घेईन. म्हणजेया गोष्टी मी सहजपणे  करायचो आणि माझ्यावेळी परमार नावाचे एक शिक्षक होते, धिप्पाड म्हणजे पीटी शिक्षक असतात तसे , बहुधा शारीरिक प्रशिक्षण देणारे शिक्षक होते . तर आमच्या इथे एका बंगल्यात एक छोटीशी व्यायामशाळा होती, तर मी त्यांच्यापासून इतका प्रेरित झालो कि मी तिथे नियमितपणे जात होतो , मी त्यावेळी मल्लखांब शिकायचो, कुस्ती शिकत होतो. कुस्ती आणि मल्लखांब म्हणजे एक लाकडी खूप मोठा खांब असतो त्यावर व्यायाम करायचा, विशेषतः महाराष्ट्रात हा मल्लखांब आढळतो, तर शरीर  सुदृढ बनवण्याचा हा एक उत्तम व्यायामप्रकार आहे. तो एक प्रकारे खांबावर करायचा योग प्रकार आहे. तर मी सकाळी 5:00 वाजता उठून तिथे जायचो  आणि ते देखील माझ्याकडून मेहनत करून घ्यायचे. मात्र मी खेळाडू बनू शकलो नाही, ठीक आहे काही काळ केले, सोडून दिले. असेच होते.

निखिल कामथ – अशा काही गोष्टी आहेत का ज्या राजकारणात एका राजकीय नेतासाठी गुणवत्ता मानता येईल  ? उदा. उद्योजकतेत जेव्हा एखादी व्यक्ती कंपनी सुरू करणार असते, त्यासाठी तीन चार गुण असणे आवश्यक असते , जसे चांगले मार्केटिंग करणारे कुणी असावे चांगली  विक्री करणारे असावे तंत्रज्ञानात कुणी चांगला असेल जो उत्पादने विकसित करेल. आज जर एखाद्या  तरुणाला राजकारणात यायचे असेल तर त्याच्यात असे गुण असायला हवे जे तुम्ही पारखू शकाल की हे असायला हवेत.

पंतप्रधान – दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत , राजकीय नेता बनणे हा एक भाग आहे आणि राजकारणात यशस्वी होणे हा दुसरा भाग आहे.  तर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक आहे राजकारणात येणे आणि दुसरे आहे यशस्वी होणे , मला वाटते की त्यासाठी तुमचे समर्पण हवे, बांधिलकी हवी , जनतेच्या सुखदुःखात तुम्ही सहभागी व्हायला हवे , तुम्ही उत्तम खेळाडू असायला हवे.  तुम्ही म्हणाल मी तीस मार खान आहे आणि मी सगळ्यांकडून कामे करून घेईन आणि सगळ्यांच्या मागे लागेन  , सगळे माझे हुकूम पाळतील , तर ते होऊ शकते , त्याचे राजकारण सुरु होईल, निवडणूक जिंकेल मात्र तो यशस्वी राजकीय नेता बनेल याची खात्री नाही. आणि हे बघा, मला कधी कधी वाटते , असेही होऊ शकते मी जो विचार करतो त्यामुळे विवाद निर्माण होऊ शकतो, जेव्हा स्वातंत्र्य चळवळ सुरु होती, त्यात समाजातील सर्व घटकातील लोक सहभागी झाले होते , मात्र सगळे राजकारणात आले नाहीत , काही लोकांनी नंतर आपले जीवन शिक्षणाप्रति समर्पित केले, काहींनी खादीचा प्रसार केला, काहींनी प्रौढ शिक्षणासाठी , काहींनी आदिवासींच्या कल्याणासाठी जीवन समर्पित केले, अशा विधायक कामांमध्ये गुंतले. मात्र स्वातंत्र्य चळवळ ही देशभक्तीने प्रेरित झालेली चळवळ होती  , भारताला स्वतंत्र करण्यासाठी माझ्यापरीने जे शक्य आहे  ते करेन अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती. स्वातंत्र्यानंतर त्यातले काहीजण  राजकारणात आले आणि सुरुवातीच्या काळात राजकारणात आलेले  आपल्या देशातील सर्व दिग्गज नेते स्वातंत्र्यलढ्यातून उदयाला आलेले नेते होते. त्यामुळे त्यांची विचारसरणी, त्यांची  परिपक्वता, त्याचे स्वरूप वेगळे आहे , पूर्णपणे वेगळे आहे , त्यांच्याबद्दल, त्यांच्या  वर्तनाबद्दल ज्या गोष्टी ऐकायला मिळायच्या त्यात  समाजाप्रती समर्पणाची उत्कट भावना असायची  आणि म्हणूनच चांगली माणसे राजकारणात निरंतर येत राहिली पाहिजेत, ध्येय समोर ठेवून यावे , महत्वाकांक्षा घेऊन नाही  असे माझे स्पष्ट मत आहे. जर तुम्ही एखादे ध्येय घेऊन निघाला  असाल तर तुम्हाला कुठेना कुठे तरी  स्थान मिळत जाईल , ध्येयाला महत्वाकांक्षेच्या तुलनेत अधिक प्राधान्य असायला हवे , मग तुमच्यात क्षमता असेल.

आता जसे महात्मा गांधीआजच्या युगातील नेत्याची  तुम्ही जी व्याख्या पाहता , त्यात महात्माजी कुठे बसतात? व्यक्तिमत्व म्हणून पाहिले तर ते अतिशय सडपातळ होते , त्यांच्याकडे वक्तृत्व असे  नव्हतेच , त्यामुळे त्या दृष्टीकोनातून पाहिल्यास ते नेते बनूच शकत नव्हते , मग काय कारण होते ? तर त्यांचे आयुष्य बोलके होते आणि ही जी ताकद होती ना , तिने संपूर्ण देशाला या व्यक्तीच्या पाठी उभे केले. आणि म्हणूनच आजकाल हे जे मोठे व्यावसायिक श्रेणीतील राजकीय नेत्यांचे रूप आपण पाहतो ना , परखड  भाषण करणारे असायला हवेत हे काही दिवस चालते , टाळ्या मिळतात, मात्र शेवटी जीवनच ठरवते, आणि दुसरे माझे मत आहे की  भाषण कला, वक्तृत्व , त्याहीपेक्षा अधिक महत्वाचा आहे संवाद, तुम्ही संवाद कसा साधता, तुम्ही बघा, महात्मा गांधी हातात स्वतःहून उंच काठी धरायचे, परंतु  अहिंसेचा पुरस्कार करायचेप्रचंड फरक होता, मात्र  ते संवाद साधायचे. महात्माजींनी कधी टोपी घातली नाही पण जग गांधी टोपी घालत होते ती संवादाची  ताकद होती, महात्मा गांधींचे राजकीय क्षेत्र होते , राजकारण होते, परंतु  शासन व्यवस्था नव्हती , त्यांनी निवडणूक लढवली नाही,ते  सत्तेत बसले नाहीत , मात्र त्यांच्या मृत्यूनंतर जे स्मारक बांधले त्याला राजघाट असे नाव देण्यात आले.

निखिल कामथ – आणि सर, तुम्ही आताच म्हणालातआजच्या संपूर्ण संभाषणाचा मुद्दा आपल्यासाठी हाच आहे की, आपल्याला तरुणांना हे सांगायचे आहे की, राजकारणाचा विचार उद्योजकता म्हणून करत रहा आणि या मुलाखतीनंतर मला आशा आहे की 10,000 स्मार्ट तरुण भारतीय तुमच्या जीवनाने प्रोत्साहित होतीलभारतात राजकारणी बनण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रेरित होतील आणि बनतील.

पंतप्रधान  –लाल किल्ल्यावरून मी म्हटले होते की, देशाला अशा एक लाख तरुणांची गरज आहे जे राजकारणात येतील  आणि मला वाटते की घेणे, मिळवणे बनणे हे जर ध्येय असेल तर ते फार काळ टिकणार नाही. उद्योजकाचे पहिले प्रशिक्षण असते विकसित होण्याचे  , येथे पहिले प्रशिक्षण असते  स्वतःला समर्पित करण्याचे जे काही आहे ते देण्याचे , तिथे मी, माझी कंपनी किंवा माझा व्यवसाय पहिल्या क्रमांकाचा कसा बनू शकतो या गोष्टी असतात आणि इथे राष्ट्र प्रथम असते , हाच खूप मोठा फरक असतो. आणि समाज देखील राष्ट्र प्रथम  विचारसरणी असलेल्या व्यक्तीलाच स्वीकारतो आणि हे राजकीय जीवन सोपे नसते , जसे लोकांना वाटते तसे नसते, काही लोक नशीबवान असतात, त्यांना काही करावे लागत नाही, ते मिळत राहते, मात्र काही कारण असू शकते, मला त्यात जायचे नाही, पण मला माहित आहे, आमच्या येथे अशोक भट्ट म्हणून एक कार्यकर्ते होते, ते आयुष्यभर एका छोट्या घरात राहत होते, अनेक वेळा मंत्रीपद भूषवले होते, त्यांच्याकडे स्वतःची गाडी  वगैरे काही नव्हते आणि पूर्वी मोबाईल  फोन नव्हते, लँडलाईन असायचे. तुम्ही त्यांना मध्यरात्री 3 वाजता फोन करा , अर्धी बेल वाजताच ते फोन उचलायचे  आणि तुम्ही त्यांना सांगितले, आणि हे पहा त्यावेळी मी राजकारणात नव्हतो, मात्र आमच्या येथे अहमदाबाद राजकोट महामार्गावर खूप अपघात घडायचे , बगोदरा (अस्पष्ट) म्हणून एक ठिकाण होते