पंतप्रधान कार्यालय
‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’, म्हणजे आपली युवा शक्ती, त्यांची स्वप्ने, कौशल्ये आणि आकांक्षांचा उत्सव आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
10 JAN 2025 7:24PM by PIB Mumbai
‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’, म्हणजे आपली युवा शक्ती, त्यांची स्वप्ने, कौशल्ये आणि आकांक्षांचा उत्सव असून, आपल्या अधिकाधिक युवा मित्रांनी देशाच्या पुनर्बांधणीचे नेतृत्व करावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' हा या संदर्भात महत्त्वाचा उपक्रम असून, यामधील तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' वरील एक्स पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे:
'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' हा युवा शक्ती, त्यांची स्वप्ने, कौशल्ये आणि आकांक्षांचा उत्सव आहे. 12 तारखेला त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे.”
“आमच्या अधिकाधिक युवा मित्रांनी देशाच्या पुनर्बांधणीचे नेतृत्व करावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' हा यासंदर्भातील महत्त्वाचा उपक्रम असून, यामधील तरुणाईचा उत्साह पाहण्याजोगा आहे. मी ही तुमच्याशी संवाद साधायला उत्सुक आहे!”
***
N.Chitale/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2091941)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam