पंतप्रधान कार्यालय
स्वाभिमान अपार्टमेंट्सच्या लाभार्थ्यांसोबत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
Posted On:
03 JAN 2025 8:38PM by PIB Mumbai
लाभार्थी: होय, सर, मला मिळाले आहे. आम्ही तुमचे अपार ऋणी आहोत. आम्हाला झोपडीतून बाहेर काढून तुम्ही महाल दिलात. एवढ्या भव्य गोष्टीची आम्ही कधी कल्पनाही केलेली नाही, पण तुम्ही आमचे स्वप्न प्रत्यक्षात आणले... होय, सर.
पंतप्रधान: चला माझे घर नसले तरी तुम्हा सर्वांना ही घरे मिळाली याचा मला आनंद आहे.
लाभार्थी: नाही सर, आम्ही तुमचे कुटुंब आहोत.
पंतप्रधान: होय, हे मात्र खरे आहे.
लाभार्थी: तुम्ही हे शक्य केले.
पंतप्रधान: तर मग आम्ही ते केले ना?
लाभार्थी: होय, सर. तुमचा ध्वज सतत उंच फडकत राहो आणि तुमचा विजय होत राहो.
पंतप्रधान: आमचा ध्वज उंच फडकत ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे.
लाभार्थी: सर तुम्ही फक्त आमच्या डोक्यावर हात ठेवा.
पंतप्रधान: माझ्या माता-भगिनींचे हात माझ्या डोक्यावर असले पाहिजेत.
लाभार्थी: आम्ही इतकी वर्षे प्रभू श्रीरामाची वाट पाहिली, तशीच आम्ही तुमची वाट पाहत होतो. आम्ही झोपडपट्ट्यांमधून बाहेर पडून या इमारतीमध्ये आलो आहोत आणि आमच्यासाठी यापेक्षा जास्त आनंद दुसरा कोणता असू शकतो. तुम्ही आमच्या इतक्या जवळ आहात हे आमचे भाग्य आहे.
पंतप्रधान: आपण या देशात एकजुटीने खूप काही साध्य करू शकतो, हा विश्वास इतरांमध्येही निर्माण झाला पाहिजे.
लाभार्थी: हो अगदी खरे आहे.
पंतप्रधान: तुमचा निर्धार असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. आजकाल, काही लोक विचार करतात, "मी झोपडपट्टीत जन्मलो; मी आयुष्यात काय करणार आहे?" पण तुम्ही ते स्वतः पाहिले आहे, आणि मुलांनाही माहीत असेल – विविध खेळांमध्ये जे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि जागतिक स्तरावर ओळख मिळवत आहेत ते देखील अशाच सामान्य परिस्थितीतून आलेले आहेत.. त्यापैकी बहुतेक लहान लहान गरीब कुटुंबातील आहेत.
पंतप्रधान: मग, तुम्ही तुमच्या नवीन घरात काय कराल?
लाभार्थी: सर, मी अभ्यास करेन.
पंतप्रधान: तर तुम्ही अभ्यास कराल!
लाभार्थी: होय.
पंतप्रधान: मग, तुम्ही आधी अभ्यास केला नाही?
लाभार्थी: नाही सर. पण इथे गेल्यावर मी चांगला अभ्यास करेन.
पंतप्रधान: खरंच? तर, तुमच्या मनात काय आहे? तुम्हाला काय व्हायचे आहे?
लाभार्थी: मॅडम.
पंतप्रधान: तुम्हाला "मॅडम" बनायचे आहे? म्हणजे तुम्हाला शिक्षक व्हायचे आहे.
पंतप्रधान: आणि तुम्ही?
लाभार्थी: मी सैनिक होईन.
पंतप्रधान: सैनिक?
लाभार्थीः होय. हम भारत के वीर जवान ऊंची रहे हमारे शान हमको प्यारा हिंदुस्तान, गाए देश प्रेम के गान हमें तिरंगे पर अनुमान अमर जवान, इस पर तन-मन-धन कुर्बान।
(आम्ही भारताचे शूर सैनिक आहोत. आमचा अभिमान सदैव उंच राहू दे! आमचे देशावर प्रेम आहे. आम्ही तिरंग्यासाठी देशभक्तीची गीते गातो आणि सैनिकांच्या अमर आत्म्याचा सन्मान करतो. त्यासाठी आम्ही आमचे तन, मन, संपत्ती बलिदान द्यायला तयार असतो).
पंतप्रधान: मग तुमचे सगळे मित्र इथे आहेत का? त्यातल्या एखादा मित्र येथे नसल्याची खंत वाटते का, किंवा तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधाल का?
लाभार्थी: तेच आहेत सर.
पंतप्रधान: अच्छा, हे तुमचे जुने मित्र आहेत?
लाभार्थी: होय, सर.
पंतप्रधान: आणि ते इथेही आले आहेत?
लाभार्थी: होय, सर.
पंतप्रधान: हे घर तुम्हाला मिळाले आहे हे आता तुम्हाला कसे वाटते?
लाभार्थी: मला खूप छान वाटतंय सर. मी झोपडपट्टीतून या घरात राहायला आलो आहे आणि ते खूपच आश्चर्यकारक आहे.
पंतप्रधान: पण आता तुमच्याकडे उत्तर प्रदेशातून खूप पाहुणे येतील नाही का? तुमचा खर्च वाढणार नाही का?
लाभार्थीः काही हरकत नाही सर.
पंतप्रधानः ही जागा देखील तुम्ही स्वच्छ ठेवाल ना?
लाभार्थी: हो सर. खूपच चांगल्या प्रकारे ठेवू.
पंतप्रधान: येथे खेळायला मैदान देखील मिळेल.
लाभार्थी: होय, सर.
पंतप्रधान: आणि तुम्ही तिथे काय कराल?
लाभार्थी: मी खेळेन.
पंतप्रधान: तुम्ही खेळाल? पण मग अभ्यास कोण करणार?
लाभार्थी: सर मी पण अभ्यास करेन.
पंतप्रधान: तुमच्यापैकी किती लोक उत्तर प्रदेशचे आहेत? बिहारचे किती आहेत? तुम्ही कुठून आलात?
लाभार्थी: बिहार जवळचा आहे, सर.
पंतप्रधान: बरं. जास्त करून कोणत्या प्रकारची कामे करणारे लोक आहेत. तुम्ही लोक आहात, जे झोपडपट्टीत राहात होते, तुम्ही लोक कोणती कामे करता?
लाभार्थी: सर, आमच्यापैकी बरेच जण मजूर म्हणून काम करतात.
पंतप्रधान: मजूर, रिक्षाचालक?
लाभार्थी: होय, सर. आमच्यापैकी काहीजण रात्री उशिरा मंडईत काम करतात.
पंतप्रधानः आणि जे लोक मंडयांमध्ये काम करतात, तर मग छठ पूजेच्या वेळी काय करता? ही यमुना तर अगदी अशी करून ठेवली आहे.
लाभार्थीः आम्ही येथेच करतो.
पंतप्रधानः म्हणजे या ठिकाणीच तुम्हाला करावी लागते? अरेरे, तर मग तुम्हाला यमुना नदीचा काहीच उपयोग होत नाही आहे.
लाभार्थीः नाही सर.
पंतप्रधानः मग आता इथे काय करणार, सामूहिक रुपात सण साजरा करणार?
लाभार्थी: होय सर.
पंतप्रधान: तुम्ही मकर संक्रांत इथे साजरी करणार का?
लाभार्थी: होय सर.
पंतप्रधान: तुम्ही असे काय कराल जेणेकरून लोकांना हा स्वाभिमान, प्रत्यक्षातील स्वाभिमान पाहाण्याची इच्छा होईल?
लाभार्थी: आम्ही नेहमीच सर्वांचे स्वागत खुल्या मनाने करू, कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, कोणाचाही द्वेष करणार नाही, सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने वागू.
पंतप्रधान: आपण काही ना काही सण एकत्र साजरे केले पाहिजेत. बघा, सगळ्यांना सांगा की मोदीजी आले होते आणि मोदीजींची गॅरंटी आहे की ज्यांना अजून घरे मिळायची आहेत ती देखील बांधली जातील, कारण आम्ही ठरवले आहे की या देशातील गरीबातल्या गरीबाकडेही पक्के छत असावे.
अस्वीकरणः हा पंतप्रधानांच्या भाषणाचा अनुवाद आहे. मूळ भाषण हिंदीत होते.
***
SonalT/ShaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2091095)
Visitor Counter : 9