पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
04 JAN 2025 12:46PM by PIB Mumbai
ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. डॉ. राजगोपाल चिदंबरम हे भारताच्या अणुकार्यक्रमातील एक प्रमुख निर्माते होते आणि भारताच्या वैज्ञानिक आणि सामरिक क्षमतांना बळकटी देण्यासाठी त्यांनी अभूतपूर्व योगदान दिले.
पंतप्रधानांनी ‘X’ या समाज माध्यमावर सांगितले:
“डॉ. राजगोपाल चिदंबरम यांच्या निधनाने मला अत्यंत दुःख झाले आहे. ते भारताच्या अणुकार्यक्रमाचे एक प्रमुख रचनाकार होते आणि त्यांनी भारताच्या वैज्ञानिक व सामरिक क्षमतांना मजबूत करण्यासाठी क्रांतिकारी योगदान दिले आहे. संपूर्ण देश त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहे आणि त्यांचे हे प्रयत्न पुढील पिढ्यांना नक्कीच प्रेरणा देतील.”
***
M.Pange/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2090137)
आगंतुक पटल : 64
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam