वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक कापड आणि वस्त्र प्रावरणे क्षेत्रातील व्यापारात भारताचा वाटा 3.9%

Posted On: 02 JAN 2025 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025

 

2023 या वर्षात भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा कापड आणि पोशाख निर्यात करणारा देश ठरला आहे. 2023-24 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीमध्ये हस्तकला  आणि पोशाख (T&A) यांचासह हा वाटा 8.21% इतका लक्षणीय  आहे. कापड  आणि वस्त्र प्रावरणे  यांच्या जागतिक व्यापारात आपल्या देशाचा वाटा 3.9% आहे.भारतातून  कापड आणि पोशाख निर्यात होणारे  प्रमुख देश अमेरिका (यूएसए) आणि युरोपियन महासंघ(ईयू) हे असून कापड आणि वस्त्र प्रावरणे निर्यातीत या देशांचा सुमारे 47% वाटा आहे.भारत हा एक प्रमुख कापड आणि पोशाख निर्यात करणारा देश असून तो व्यापार अधिशेषाचा लाभ घेतो.  यासाठी मोठ्या प्रमाणावर होणारी आयात ही पुन्हा होणाऱ्या निर्यातीसाठी किंवा कच्च्या मालाच्या उद्योगासाठी आवश्यक अशीच आहे.

निर्यातीमध्ये मागणी आणि पुरवठा यांचा संबंध येत असून ती  जागतिक मागणी, अंतर्गत वापर आणि मागणी, मागणीचे प्रवाह, वाहतूक व्यवस्था इत्यादी घटकांवर अवलंबून असते, हे लक्षात घेण्यासारखे आहे.अनेक भू-राजकीय परिस्थितींचा  (जसे की लाल समुद्रीय संकट, बांगलादेशचे संकट इ.) निर्यातीवरही परिणाम होत असतो.जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2024 दरम्यान लाल समुद्रीय प्रदेशाच्या आसपासच्या भू-राजकीय संकटांचा निर्यात हालचालींवर परीणाम झाल्यामुळे,आर्थिक वर्ष 2024 मध्ये सुरुवातीला निर्यातीवर परिणाम झाला.

हस्तकला यासह वस्त्रांची आणि पोशाखांची निर्यात (एप्रिल-ऑक्टोबर)

मूल्य दशलक्ष अमेरिकन डॉलर मध्ये 

Commodity

Oct-23

Oct-24

% Change

Apr-Oct 2023

Apr-Oct 2024

% Change

Readymade Garment

909

1227

35%

7,825

8,733

12%

Cotton Textiles

1005

1049

4%

7,014

7,082

1%

Man-made textiles

414

474

14%

2,958

3,105

5%

Wool & Woolen textiles

16

14

-11%

117

95

-19%

Silk Products

13

14

5%

70

98

40%

Handloom Products

12

13

4%

89

84

-6%

Carpets

126

147

17%

795

893

12%

Jute Products

25

36

44%

218

220

1%

Total Textile & Apparel

2,520

2,974

18%

19,087

20,309

6%

Handicrafts

129

171

33%

921

1,050

14%

Total T&A including Handicrafts

2,649

3,144

19%

20,007

21,358

7%

स्रोत: डीजीसीआयएस, तात्पुरत्या माहितीनुसार 

कापड आणि पोशाखांच्या (हस्तकलेसह)  एकूण निर्यातीत आर्थिक वर्ष 2024-25 च्या एप्रिल-ऑक्टोबर या  (21,358 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स)  

कालावधीत, आर्थिक वर्ष  2023-24 मधील ($20,000 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) याच  कालावधीच्या तुलनेत 7% वाढ झाली आहे. 

आर्थिक वर्ष 2024-25 च्या एप्रिल-ऑक्टोबर या कालावधीत एकूण निर्यातीपैकी ($21,358 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) तयार कपड्यांच्या श्रेणीचा (रेडीमेड गारमेंट्स,RMG)वाटा सर्वात मोठा (41%,($8,733 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) आहे, त्यानंतर सुती कापड (33%, एकूण निर्यात $7,082 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स),मानवनिर्मित कापड (15%,एकूण निर्यात,$3,105 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ) यांचा वाटा आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 च्या एप्रिल-ऑक्टोबर या कालावधीत 2023-24च्या याच कालावधीच्या तुलनेत सर्व प्रमुख वस्तूंमध्ये निर्यात वाढ झाली आहे परंतु लोकर आणि हातमाग वस्त्र यांच्या निर्यातीमध्ये मात्र अनुक्रमे 19% आणि 6% ने घट झाली आहे.

हस्तकला आणि पोशाखांची आयात (एप्रिल-ऑक्टोबर)

मूल्य दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मध्ये

Commodity

Oct-23

Oct-24

% Change

Apr-Oct 2023

Apr-Oct 2024

% Change

Readymade Garment

162

183

13%

934

951

2%

Cotton Textiles

209

310

48%

1,529

1,721

13%

Man-made textiles

342

297

-13%

2,127

1,859

-13%

Wool & Woolen textiles

30

28

-8%

219

197

-10%

Silk Products

15

16

5%

130

102

-21%

Handloom Products

0

0

34%

1

1

56%

Carpets

4

4

0%

19

21

12%

Jute Products

20

24

20%

179

151

-16%

Total Textile & Apparel

783

861

10%

5,138

5,004

-3%

Handicrafts

34

44

29%

326

421

29%

Total T&A including Handicrafts

817

905

11%

5,464

5,425

-1%

स्रोत: डीजीसीआयएस, तात्पुरत्या माहितीनुसार 

आर्थिक वर्ष 2023-24 ($8,946 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) मध्ये भारताकडून कापड आणि वस्त्र उत्पादनांची आयात आर्थिक वर्ष 2022-23 ($10,481 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) च्या तुलनेत अंदाजे 15% कमी झाली आहे.

2023-24 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-ऑक्टोबर कालावधीत ($5,464 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) या कालावधीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 मधे  ($5,425 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) कापड आणि पोशाख (हस्त भरतकाम केलेले) यांची एकूण आयात 1% कमी झाली आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 च्या एप्रिल-ऑक्टोबर या कालावधीत एकूण आयातीमध्ये (5,425 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) मध्ये  ($1859 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) आयातीसह  मानवनिर्मित वस्त्र श्रेणीचा सर्वात मोठा वाटा (34%) आहे, या क्षेत्रात मागणी पुरवठ्यात तफावत आहे.

सुती कापडाच्या आयातीतील वाढ प्रामुख्याने लांब धाग्याच्या कॉटन फायबरच्या आयातीमुळे दिसून येते आणि आयातीचा हा  वाढता कल; वापर आणि स्वावलंबन यांत  देशाच्या उत्पादन क्षमतेत होणारी  वाढ सूचित करतो.

 

* * *

N.Chitale/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2089646) Visitor Counter : 41