पंतप्रधान कार्यालय
ओसामु सुझुकी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
27 DEC 2024 5:58PM by PIB Mumbai
जागतिक मोटर वाहने उद्योगातील नामवंत ओसामु सुझुकी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ओसामु सुझुकी यांनी दूरदृष्टीने केलेल्या कामामुळे वाहतुकीविषयीचा जागतिक दृष्टिकोन बदलला, अशी टिप्पणी मोदी यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली सुझुकी मोटर कॉर्पोरेशन उद्योग आव्हानांचा सामना करीत, नवोन्मेषाधारे व्याप्ती वाढवित जागतिक ऊर्जाकेंद्र बनला.
पंतप्रधानांनी X वरील संदेशात म्हटले,
“जागतिक मोटर वाहने उद्योगातील नामवंत ओसामु सुझुकी यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाले आहे. त्यांनी दूरदृष्टीने केलेल्या कामामुळे वाहतुकीविषयीचा जागतिक दृष्टिकोन बदलला. त्यांच्या नेतृत्वाखाली सुझुकी मोटर कॉर्पोरेशन उद्योग आव्हानांचा सामना करीत, नवोन्मेषाधारे व्याप्ती वाढवित जागतिक ऊर्जाकेंद्र बनला. भारताप्रती त्यांना अतीव आपुलकी होती आणि मारुतीसह त्यांच्या सहयोगाने भारतीय मोटर वाहन उद्योगात क्रांती झाली.”
सुझुकी यांच्यासमवेत अनेकवेळा झालेल्या संवादाच्या स्मृती मी जपून ठेवल्या आहेत, त्यांच्या व्यावहारिक आणि विनम्र दृष्टीकोनाची मी मनापासून प्रशंसा करतो. कठोर परिश्रम,तपशीलावर बारकाईने लक्ष आणि दर्जाप्रती अतूट वचनबद्धता याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी सादर केले.
त्यांचे कुटुंब, सहकारी आणि अगणित चाहत्यांप्रती माझ्या शोक संवेदना.”
***
N.Chitale/R.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2088482)
Visitor Counter : 21