गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त 'सदैव अटल' या स्मृतीस्थळावर केले अभिवादन
अटलजींचे सुशासन आणि जनकल्याणासाठीचे समर्पण पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील - केंद्रीय मंत्री अमित शाह
प्रविष्टि तिथि:
25 DEC 2024 1:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त 'सदैव अटल' या त्यांच्या स्मृतीस्थळावर भेट देऊन त्यांचे अभिवादन केले.

एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, अटलजींचे सुशासन आणि जनकल्याणासाठीचे समर्पण पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. अटल बिहारी वाजपेयीजींच्या जयंतीनिमित्त नतमस्तक होताना, शाह म्हणाले की, अटलजींनी आपल्या विचारधारेशी व मूल्याधारित राजकारणाशी समर्पित राहून देशात विकास आणि सुशासनाचा नवा अध्याय सुरू केला. त्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाला कार्यसंस्कृती बनवले आणि नेहमीच देशाची सुरक्षा व जनकल्याण यांना प्राधान्य दिले. ते असेही म्हणाले की, अटलजींनी देशसेवेच्या मार्गावर देशवासीयांना सदैव मार्गदर्शन केले आणि ते सर्वांसाठीच कायमस्वरूपी एका ध्रुवताऱ्यासारखे प्रेरणास्थान बनून राहतील.
* * *
S.Tupe/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2087822)
आगंतुक पटल : 63