Posted On:
24 DEC 2024 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024
प्रख्यात गायक मोहम्मद रफी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. मोहम्मद रफी साहब संगीतातील असामान्य प्रतिभावंत होते, अनेक पिढ्यांवर त्यांची सांस्कृतिक छाप आणि प्रभाव राहिला असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी X समाज माध्यमावरील संदेशात म्हणतातः
"प्रख्यात गायक मोहम्मद रफी साहेबांना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त अभिवादन. ते अत्यंत प्रतिभावंत कलाकार होते. त्यांची सांस्कृतिक छाप आणि प्रभाव अनेक पिढ्यांवर राहिला आहे. आपल्या गायनातून गाण्याच्या भाव- भावना अचूकपणे टिपण्याचे रफी साहेबांचे कौशल्य कायमच वाखाणले जाते. त्यांची बहुमुखी प्रतिभा व्यापक होती. त्यांची गीते यापुढेही लोकांच्या जीवनात आनंदाची भर घालत राहोत!"
N.Chitale/M.Ganoo/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai