पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घेतली कुवेतच्या युवराजांची भेट
Posted On:
22 DEC 2024 5:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे युवराज महामहीम शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबा यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी सप्टेंबर 2024 मध्ये यूएनजीए सत्राच्या वेळी महामहीम युवराजांसोबत झालेल्याल भेटीच्या आठवणींना या प्रसंगी उजाळा दिला.
पंतप्रधानांनी भारतासाठी कुवेतसोबतचे द्विपक्षीय संबंध अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या नेत्यांनी द्विपक्षीय संबंध चांगल्या प्रकारे प्रगती करत असल्याची दखल घेतली आणि हे संबंध धोरणात्मक भागीदारीच्या स्तरावर उंचावल्याबद्दल आनंद व्यक्त केला. संयुक्त राष्ट्र आणि अन्य बहुपक्षीय मंचांवर दोन्ही बाजूमध्ये जास्त प्रमाणात समन्वय टिकवून ठेवण्यावर त्यांनी भर दिला.
पंतप्रधानांनी यावेळी विश्वास व्यक्त केला की कुवेतच्या अध्यक्षतेखाली भारत-जीसीसी संबंध आणखी बळकट होतील.
पंतप्रधानांनी कुवेतच्या युवराजांना परस्पर सोयीच्या तारखांना भारत भेटीचे निमंत्रणही दिले.
कुवेतच्या युवराजांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित केली.
***
S.Patil/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2087119)
Visitor Counter : 13