पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा कुवेतच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
प्रविष्टि तिथि:
22 DEC 2024 4:48PM by PIB Mumbai
कुवेतचे अमीर, महामहिम शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार "ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर" प्रदान केला. या प्रसंगी कुवेतचे पंतप्रधान महामहिम शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबा देखील उपस्थित होते.
पंतप्रधानांनी हा पुरस्कार भारत आणि कुवेत यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीला, कुवेतमधील भारतीय समुदायाला आणि 1.4 अब्ज भारतीय नागरिकांना समर्पित केला.
43 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांच्या ऐतिहासिक कुवेत भेटीवेळी प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे.
हा पुरस्कार १९७४ पासून प्रदान करण्यात येत असून तो निवडक जागतिक नेत्यांना देण्यात आला आहे.
***
S.Patil/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2087025)
आगंतुक पटल : 80
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam