गृह मंत्रालय
सशस्त्र सीमा दलाच्या 61 व्या स्थापना दिनानिमित्त पश्चिम बंगालमधील सिलीगुडी इथे झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
एसएसबीचे जवान सीमावर्ती भागातील तरुणांना प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराला चालना देत असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन
सशस्त्र सीमा दलाने भारताच्या सीमावर्ती भागातील गावांची संस्कृती, भाषा आणि समृद्ध वारसा देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे अजोड काम केल्याचे गृहमंत्री अमित शाह यांचे गौरवोद्गार
Posted On:
20 DEC 2024 7:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2024
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे सशस्त्र सीमा दलाच्या (एसएएसबी) च्या 61 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी आगरतळा येथील इंटिग्रेटेड चेक पॉइंट (आयसीपी), आणि पेट्रापोल येथील बीजीएफ च्या नवीन निवासी संकुलाचे देखील ई-उद्घाटन केले.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, सशस्त्र सीमा दलाने भारताच्या सीमावर्ती भागातील गावांची संस्कृती, भाषा आणि समृद्ध वारसा देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे अजोड काम केले आहे.
अमीत शाह म्हणाले की, एसएएसबीचे जवान नेपाळ आणि भूतानबरोबरच्या भारताच्या 2450 किलोमीटर लांबीच्या सीमेवर अखंड पहारा देत आहेत, त्यामुळे देशवासीय आपल्या सुरक्षेबद्दल निश्चिंत आहेत.
ते म्हणाले की, एसएसबीने सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस दलाच्या समन्वयाने पूर्वेकडील संपूर्ण प्रदेश नक्षलमुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सुमारे चार दशकांनंतर बिहार आणि झारखंड नक्षलमुक्त करण्यात एसएएसबी ने महत्वाची भूमिका बजावली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, एसएसबी सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी, अंमली पदार्थ, शस्त्रे, वन्यजीव, वन उत्पादने आणि बनावट चलनाची तस्करी रोखण्यासाठी शून्य सहनशीलतेच्या धोरणासह सातत्त्याने काम करत आहे. ते म्हणाले की, एसएसबीने 4,000 हून अधिक तस्कर, 16000 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ, 208 शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे.
ते म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये एसएसबीला तैनात केल्यामुळे सर्व सुरक्षा दलांना मोठे बळ मिळाले आहे. गृहमंत्र्यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये एसएसबीच्या जवानांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईमध्ये 19 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आणि 14 दहशतवाद्यांना अटक केली.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की एसएसबीचे कर्तव्य केवळ सुरक्षेपुरते मर्यादित नसून, हे दल विविध मदत कार्यांमध्ये सहभागी झाले, तसेच आपत्तींच्या काळात पूर्ण सज्जतेने नागरिकांना सहाय्य केले.
अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आयुष्मान कार्ड, बॅरेक्स, सीएपीएफ ई-हाऊसिंग आणि शिष्यवृत्ती यांसारख्या योजनांद्वारे सीएपीएफ कर्मचाऱ्यांचे जीवन सुखकर करत आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमीत शाह म्हणाले की, क्रीडा क्षेत्रातही, एसएएसबी ने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली असून, देशासाठी 72 पदके जिंकली आहेत.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2086606)
Visitor Counter : 26