रेल्वे मंत्रालय
महाकुंभमेळ्यादरम्यान मोफत रेल्वे प्रवासाबाबत दिशाभूल करणाऱ्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण
Posted On:
18 DEC 2024 2:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2024
महाकुंभमेळ्यादरम्यान प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असा दावा करणारे वृत्त काही माध्यमे प्रसारित करत असल्याचे भारतीय रेल्वेच्या लक्षात आले आहे. हे वृत्त पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे.
भारतीय रेल्वेच्या नियम आणि कायद्यानुसार वैध तिकीटाशिवाय प्रवास करणे कठोररित्या प्रतिबंधित असून तिकीटाशिवाय प्रवास करणे दंडनीय अपराध आहे. महाकुंभमेळा किंवा इतर कोणत्याही प्रसंगी मोफत रेल्वे प्रवासाची तरतूद भारतीय रेल्वेच्या नियमात केलेली नाही.
महाकुंभमेळ्यादरम्यान प्रवाशांसाठी अखंड प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वे वचनबद्ध आहे. प्रवाशांच्या अपेक्षित वाढलेल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष होल्डिंग एरिया, अतिरिक्त तिकीट खिडक्या आणि इतर आवश्यक सुविधांसह पुरेशी व्यवस्था केली जात आहे.
* * *
JPS/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2085587)
Visitor Counter : 31