पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्याचे स्वागत
आयएमईईसी कॉरिडॉरसह भारत-संयुक्त अरब अमिराती सर्वसमावेशी धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यासाठी विविध उपक्रमांबाबत द्विपक्षीय चर्चा
पश्चिम आशियासह विस्तृत प्रदेशात दीर्घकालीन शांतता, स्थैर्य आणि सुरक्षेला पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार
भारतीय समुदायाच्या कल्याणाची खात्री केल्याबद्दल संयुक्त अरब अमिरातीच्या नेतृत्वाचे पंतप्रधानांनी मानले आभार
Posted On:
12 DEC 2024 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल् नह्यान यांच्या आगमनाप्रसंगी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल् नह्यान यांना हार्दिक शुभेच्छा कळवल्या आहेत. अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल् नह्यान यांच्या सप्टेंबर 2024 मधील भारतभेटीसह होत असलेले इतर उच्चस्तरीय पदस्थांचे दौरे आणि देवाणघेवाणीमुळे द्विपक्षीय संबंध पिढ्यान्-पिढ्या सातत्यपूर्ण राहात असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
तंत्रज्ञान, ऊर्जा आणि दोन्ही देशांतील जनतेतील परस्परबंधांसह सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला.
आयएमईईसी अर्थात भारत-मध्य पूर्व युरोपला जोडणारा मार्ग ऐतिहासिक उपक्रम असून त्यामुळे प्रादेशिक जुळणी आणि समृद्धीला चालना मिळेल असे म्हणून पंतप्रधानांनी या उपक्रमाच्या अंमलबजावणीवर विशेष भर दिला.
शेख अब्दुल्ला बिन झायेद अल् नह्यान यांनी पश्चिम आशियातील प्रचलित परिस्थितीबाबत आपला दृष्टीकोन मांडला. पश्चिम आशियासह विस्तृत प्रदेशात दीर्घकालीन शांतता, स्थैर्य आणि सुरक्षेला पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.
संयुक्त अरब अमिरातीतील मोठ्या, चैतन्यपूर्ण भारतीय समुदायाच्या कल्याणाची खात्री केल्याबद्दल संयुक्त अरब अमिरातीच्या नेतृत्वाचे पंतप्रधानांनी आभार मानले.
* * *
S.Patil/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2083991)
Visitor Counter : 44
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam