पंतप्रधान कार्यालय
दिल्लीतील अष्टलक्ष्मी महोत्सवात ईशान्येतील आकर्षक वस्त्रोद्योग, पर्यटनातील संधी आणि पारंपरिक कारागिरीचा उत्सव साजरा : पंतप्रधान
Posted On:
08 DEC 2024 1:33PM by PIB Mumbai
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लिहिलेला लेख समाजमध्यमावर सामायिक करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील अष्टलक्ष्मी महोत्सव हा ईशान्येतील आकर्षक वस्त्रोद्योग क्षेत्रातील तसेच पर्यटनाच्या संधी आणि पारंपरिक कारागिरीचा उत्सव साजरा करत असल्याचे म्हंटले आहे. ‘एक्स’ या समाजमध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलने लिहिले आहे की:
“ईशान्य भारतामध्ये संपर्क सुविधांमधील सुधारणा, डिजिटल समावेशन आणि पायाभूत सुविधांमधील गुंतवणूकीद्वारे उल्लेखनीय विकास साधला जात आहे. दिल्लीतील अष्टलक्ष्मी महोत्सव ईशान्येतील सळसळता, आकर्षक वस्त्रोद्योग, तिथल्या पर्यटनाला असलेल्या संधी आणि पारंपरिक कारागिरीचा उत्सव साजरा करत असल्याचे केंद्रीय मंत्री @JM_Scindia यांच्या लेखातून स्पष्ट होत आहे.”
***
S.Bedekar/H.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2082118)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam