पंतप्रधान कार्यालय
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे केले अभिनंदन
महाराष्ट्राच्या गतिमान विकासासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे दिले आश्वासन
प्रविष्टि तिथि:
05 DEC 2024 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2024
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या गतिमान विकासासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस जी यांचे अभिनंदन.
राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल एकनाथ शिंदे जी आणि अजित पवार जी यांचे अभिनंदन.
ही टीम अनुभव आणि धडाडी यांचा मिलाफ असून त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच महायुतीला महाराष्ट्रात ऐतिहासिक जनादेश मिळाला आहे. ही टीम राज्यातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि सुशासनासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल.
मी महाराष्ट्राच्या गतिमान विकासासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन देतो.”
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2081354)
आगंतुक पटल : 131
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam