पंतप्रधान कार्यालय
पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धा 2024 चे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय पुरुष कनिष्ठ हॉकी संघाचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
05 DEC 2024 10:44AM by PIB Mumbai
पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धा 2024 चे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष कनिष्ठ हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर अभिनंदनपर संदेश लिहिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक्स या समाज माध्यमावरचा संदेश
हॉकी मध्ये अजिंक्यपद पटकावलेल्या आपल्या संघाचा अभिमान वाटतो आहे! भारतीय हॉकीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असून, आपल्या पुरुष कनिष्ठ संघाने कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धा 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. त्यांचे अद्वितीय कौशल्य, अढळ निर्धार आणि विलक्षण सांघिक कामगिरीमुळे हा विजय क्रीडा वैभवाच्या इतिहासात कायमचा कोरला गेला आहे. युवा विजेत्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.
***
SonalT/TusharP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2080947)
आगंतुक पटल : 105
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Odia
,
Tamil
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada