माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 4

'स्नो फ्लावर:' सुदूर सीमापार संस्कृती, कुटुंब आणि अस्मितांची कथा


समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय क्षेत्रात बहरणारी एक कथा, ‘स्नो फ्लावर’ कुटुंब, प्रेम आणि आपुलकीच्या विषयांचा मागोवा घेते

#IFFIWood, 23 नोव्‍हेंबर 2024

 

55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, स्नो फ्लावरने भव्य प्रीमियर दरम्यान आपली छाप पाडली आणि चित्रपटाचे कलाकार आणि तंत्रज्ञ ज्यामध्ये प्रशंसाप्राप्त दिग्दर्शक गजेंद्र विठ्ठल अहिरे, छाया कदम, वैभव मांगले आणि सरफराज आलम सफू यांनी गोव्यात काल पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. 

मराठी भाषेतील हा चित्रपट रशिया आणि कोकण या दोन भिन्न संस्कृतींना जोडणारी दोन देशांमधील एक मार्मिक कथा आहे. . हिमाच्छादित सायबेरिया आणि हिरवेगार कोकण यांच्या विरोधाभासी पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट भारतात राहणारी आजी आणि रशियात राहणारी नात यांच्यातील ‘अंतर’ चा मागोवा घेतो.

दिग्दर्शक गजेंद्र विठ्ठल अहिरे यांनी स्नो फ्लावरमागील सर्जनशील प्रक्रियेची माहिती दिली. अहिरे यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीतील चित्रीकरणाच्या आव्हानांचा ठळक उल्लेख केला. सायबेरियातील खांटी-मनस्किन्स्क येथे तापमान उणे 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्यामुळे कलाकार आणि तंत्रज्ञांच्या छोट्या पथकाला कठीण परिस्थितीत काम करावे लागले. मात्र ही आव्हाने असूनही, पथकाच्या समर्पण आणि मजबूत टीमवर्कमुळे त्यांना कथेची भावनिक खोली पकडणारा करणारा चित्रपट बनवता आला.

अहिरे म्हणाले, "आम्ही रशियाला पोहोचलो तेव्हा तापमान उणे 14 अंश होते." "त्यांनी आमची काळजी घेतली - बूट , कपडे, जॅकेट, अगदी साबण आणि शॅम्पू देखील उपलब्ध करून दिले.  त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही चांगले काम करू शकलो आणि कथेला न्याय देऊ शकलो." त्यांनी नमूद केले की भाषेतील अडथळे असूनही कारण आमच्या पथकापैकी कुणीही इंग्रजी बोलत नाही आणि रशियन क्रूला हिंदी येत नाही त्यामुळे  चित्रपट निर्मितीच्या वैश्विक भाषेवर आणि परस्पर सन्मानावर विश्वास ठेवून टीम प्रभावीपणे संवाद साधण्यात यशस्वी झाली. “आमच्या  संस्कृतीचा एक भाग म्हणून आम्ही दररोज सकाळी पहिल्या शॉटच्या आधी गणपतीची आरती करतो. रशियाच्या क्रूने पहिले दोन दिवस हे पाहिले आणि तुमचा विश्वास बसणार नाही,त्यांनी तिसऱ्या दिवसापासून आरती करायला सुरुवात केली. ते म्हणाले आम्हाला समजत नाही पण ते करायला छान  वाटते,” असे त्यांनी हसत सांगितले.

वैभव मांगले यांनी सांगितले की चित्रीकरणासाठी रशियाची निवड, केवळ त्याच्या आकर्षक भौगोलिक परिस्थितीसाठी नव्हे तर कोकणाबरोबरच्या सांस्कृतिक भिन्नतेसाठी जाणीवपूर्वक केली होती. सायबेरियाच्या बर्फाच्छादित दृश्यांनी कथेतील भावनिक आणि भौगोलिक विभाजनासाठी एक परिपूर्ण पार्श्वभूमी प्रदान केली आहे, जी हिरव्यागार, उष्णकटिबंधीय कोकण प्रदेशाला  विरोधाभासी चित्र दर्शवते.

चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री छाया कदम यांनी दोन्ही देशांमधील विरोधाभास चित्रित करण्याचा आपला  अनुभव सामायिक  केला. "मी गजेंद्रची खूप मोठी चाहती आहे, आणि त्याच्यासोबत काम केल्यामुळे मला रशिया आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक तफावत  चित्रित करण्याची संधी मिळाली," असे त्यांनी  स्पष्ट केले.

चित्रपटातील प्रमुख अभिनेता सरफराज आलम सफू यांनी सेटवर अनुभवलेल्या सहयोगी भावनेवर जोर दिला.  मॉस्कोमध्ये राहणारे सफू यांनी कमीत कमी उपकरणे आणि पायाभूत सुविधांसह काम करण्याच्या छोट्या चमूच्या क्षमतेची प्रशंसा केली.  "मर्यादित संसाधने असतानाही आम्ही चित्रीकरण पूर्ण करण्यात यशस्वी झालो. दिग्दर्शक गजेंद्र यांनी मला व्यक्त होण्यासाठी मोकळीक दिली आणि मी कलाकार आणि इतर चमू यांच्याकडून खूप काही शिकलो," सफू म्हणाले. या चित्रपटाचा प्रेक्षकांवर झालेला भावनिक परिणामही त्यांनी ठळकपणे मांडला, अनेक रशियन प्रेक्षक, जे येथे इफ्फीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत त्यांना चित्रपट पाहताना अश्रू अनावर झाले.  "दोन्ही देशांमधील संबंध वाढत आहेत," असे त्यांनी नमूद केले.  "मला आशा आहे की हा चित्रपट रशियन आणि भारतीय चित्रपट निर्मात्यांना अधिक सहकार्यासाठी प्रेरणा देईल," सफू म्हणाले.

कोकणातील अप्रतिम समुद्रकिनाऱ्यापासून सायबेरियाच्या अतिशीत, बर्फाच्छादित भूप्रदेशापर्यंत जात हा चित्रपट पात्रांची भावनिक अशांतता प्रतिबिंबित करत एक स्पष्ट दृश्य तफावत मांडतो.

पत्रकार परिषदेत चित्रपट निर्मात्यांनी प्रसारमाध्यमे आणि प्रेक्षकांना प्रादेशिक चित्रपटांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.  "हा एक प्रादेशिक चित्रपट आहे जो प्रत्येक भारतीयाने पाहावा," असे अहिरे म्हणाले.  "हे  फक्त दोन संस्कृतींमध्ये अडकलेल्या मुलीच्या कथेबद्दल नाही, तर ते कुटुंब, प्रेम आणि आपुलकीच्या वैश्विक संकल्पनेबद्दल आहे.”

निकिता जोशी यांनी पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन केले.

तुम्ही येथे पत्रकार परिषद पाहू शकता: 

चित्रपटाबद्दल

'स्नो फ्लॉवर' जानेवारी 2024 मध्ये संपूर्ण भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

स्नो फ्लॉवरचे हृदय एका तरुण मुलीच्या, परीच्या भावनिक प्रवासात आहे, जी स्वतःला दोन भिन्न जगांमध्ये फाटलेली पाहते.  ही कथा दोन देशांमध्ये उलगडते: भारतातील कोकणात बाबल्या, एक तरुण स्वप्न पाहणारा तरुण, रशियाला जाणाऱ्या दशावतार थिएटर ग्रुपमध्ये सामील होण्याची इच्छा प्रकट करतो, ज्यामुळे त्याचे आई-वडील, दिग्या आणि नंदा यांच्याबरोबरचे त्याचे नाते ताणले जाते.  रशियामध्ये बाबल्या आयुष्य घडवतो, लग्न करतो आणि त्याला एक मुलगी होते, परी.  तथापि, पबमधील भांडणात बाबल्याचा मृत्यू होण्याची शोकांतिका घडते आणि त्याचे पालक अनाथ परीला कोकणात परत आणण्यासाठी रशियाला जातात. तिला प्रेमाने वाढवण्याचे प्रयत्न करूनही त्यांना लवकरच उमजते की मुलीचे खरे स्थान रशियामध्ये आहे, जिथे तिला पूर्णत्व आणि आनंद लाभू शकतो. मुलगी आणि तिची मायभूमी यांच्यातील सखोल संबंधांची जाणीव होऊन नंदा परीला रशियाला परत पाठविण्याचा हृदयद्रावक निर्णय घेते. 

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sushma/Nandini/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2076414) Visitor Counter : 13