पंतप्रधान कार्यालय
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांची,पंतप्रधान मोदी यांनी घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
21 NOV 2024 10:42PM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाउन, गयाना येथे झालेल्या दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर महामहीम
त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकाचे पंतप्रधान डॉ कीथ रॉली यांची भेट घेतली.
त्रिनिदाद आणि टोबॅगोने भारताचे प्रमुख UPI प्लॅटफॉर्म स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान रॉली यांचे अभिनंदन केले आणि डिजिटल परिवर्तनाच्या क्षेत्रात अधिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वर्षाच्या सुरुवातीला ICC T20 पुरुष क्रिकेट विश्वचषकाचे यशस्वीपणे यजमानपद भूषविल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान रॉली यांची प्रशंसा केली.
बैठकीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी सुरक्षा, आरोग्य, वाहतूक, कृषी, क्षमता निर्माण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्परांच्या- लोकसहकार्यासह द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीवर चर्चा केली.बैठकीनंतर अन्नप्रक्रियेवरील सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाली.
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2075833)
आगंतुक पटल : 51
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam