पंतप्रधान कार्यालय
रिओ दि जानेरो येथील G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
Posted On:
20 NOV 2024 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2024
रिओ दि जानेरो येथे सुरु असलेल्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांची भेट घेतली.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आणि ब्राझीलच्या G20 आणि IBSA च्या यशस्वी अध्यक्षपदासाठी त्यांचे अभिनंदन केले. गरीबी आणि उपासमारी विरोधात जागतिक आघाडी स्थापन करण्यासाठी ब्राझीलने घेतलेल्या पुढाकाराबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि या उपक्रमाला भारताचा भक्कम पाठिंबा असल्याचे नमूद केले.
पंतप्रधानांनी G20 ट्रोइका सदस्य, या नात्याने ब्राझीलच्या G20 उद्दिष्टाला भारताचे समर्थन असल्याचे देखील अधोरेखित केले, हे उद्दिष्ट शाश्वत विकास आणि जागतिक प्रशासन सुधारणांवर केंद्रित असून, त्यामध्ये ग्लोबल साउथच्या समस्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
पुढील वर्षी ब्राझीलच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या BRICS आणि COP 30 परिषदेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्याला भारताचे पूर्ण पाठबळ राहील, असे आश्वासन दिले.
या बैठकीत कृषी, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, पर्यटन, जैवइंधन, फार्मास्युटिकल्स आणि अवकाश यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून भारत-ब्राझील सामरिक भागीदारी वाढविण्यावरही चर्चा झाली.
दोन्ही नेत्यांनी जागतिक आणि प्रादेशिक दृष्ट्या महत्त्वाच्या मुद्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2075263)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam