पंतप्रधान कार्यालय
लालकृष्ण अडवाणी जी यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
08 NOV 2024 8:50PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लालकृष्ण अडवाणी जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भारताच्या विकासाला पुढे नेण्यासाठी स्वतःला समर्पित करणारे लालकृष्ण अडवाणी जी म्हणजे भारताच्या सर्वाधिक प्रशंसनीय राजनेत्यांपैकी एक आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी जी यांच्या निवासस्थानी देखील गेले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
"लालकृष्ण अडवाणी जी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.यावर्षी हा वाढदिवस आणखी विशेष आहे कारण त्यांच्या असामान्य देशसेवेबद्दल त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात आले. भारताच्या सर्वाधिक प्रशंसनीय राजनेत्यांपैकी एक असलेल्या त्यांनी भारताच्या विकासाला पुढे नेण्यासाठी स्वतःला समर्पित केले आहे. त्यांची विद्वत्ता आणि समृद्ध अंतर्दृष्टी यासाठी ते नेहमीच आदरणीय ठरले आहेत. त्यांच्याकडून अनेक वर्षे मला मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी अतिशय भाग्यवान आहे. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, अशी मी प्रार्थना करतो.
अडवाणी जी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या."
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2071913)
Visitor Counter : 27
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam