पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात केला निषेध
अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे भारताचा संकल्प कधीही कमकुवत होणार नाही. कॅनडाच्या सरकारने न्याय सुनिश्चित करावा आणि कायद्याचे राज्य राखावे अशी आमची अपेक्षा : पंतप्रधान
Posted On:
04 NOV 2024 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील एका हिंदू मंदिरावर नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा तसेच भारतीय राजनितीज्ञांना धमकावण्याच्या प्रयत्नांचा तीव्र निषेध केला आहे. पंतप्रधानांनी भारताच्या दृढ निश्चयावर भर देत, कॅनडाच्या सरकारकडून न्याय आणि कायद्याचे राज्य कायम राखण्याचे आवाहन केले.
X या समाज माध्यमावरच्या आपल्या वक्तव्यात पंतप्रधानांनी म्हटले आहे :
"कॅनडातील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक केलेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. आमच्या राजनितीज्ञांना धमकावण्याचा भ्याड प्रयत्न तितकाच भयंकर आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे भारताचा संकल्प कधीच कमकुवत होणार नाही. कॅनडाच्या सरकारने न्याय सुनिश्चित करावा आणि कायद्याचे राज्य कायम राखावे अशी आमची अपेक्षा आहे."
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2070732)
अभ्यागत कक्ष : 120
Read this releasein:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam