माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एफटीआयआय स्टुडंट्सफिल्म ‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो’ ठरली 2025 च्या ऑस्कर मध्ये लाईव्ह ऍक्शन लघुपट श्रेणीत पात्र
एफटीआयआय निर्मित आणि कान महोत्सवातली ला-सिनेफ विजेती फिल्म 97व्या अकादमी पुरस्कारांच्या स्पर्धेत
Posted On:
04 NOV 2024 9:36PM by PIB Mumbai
: मुंबई/पुणे, November 4, 2024
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया( एफटीआयआय )ची स्टुडंट्स फिल्म‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो’ 2025 च्या ऑस्करमध्ये लाईव्ह ऍक्शन लघुपट श्रेणीत पात्र ठरली आहे.एफटीआयआय चे विद्यार्थी चिदानंद नाईक यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि यापूर्वी कान चित्रपट महोत्सवात ला सिनेफश्रेणीत तो प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.यामुळे लोककथांवर आधारित असलेल्या या कन्नड भाषेतील चित्रपटाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे.
चिदानंद नाईक हे एफ टी आय चे विद्यार्थी असताना त्यांनी तयार केलेल्या या लघुपटातून एका प्रतिभावान संघाच्या प्रतिभेचे दर्शन घडत आहे ज्यामध्ये सूरज ठाकूर(सिनेमॅटोग्राफी), मनोज व्ही(एडिटिंग) आणि अभिषेक कदम(साऊंडडिझाईन) यांचा समावेश आहे.अतिशय मार्मिक आणि गहन भाष्य करणारा हा लघुपट एका प्रौढ महिलेभोवती केंद्रित आहे, जी महिला एक कोंबडा चोरते आणि त्यानंतर त्या गावात सूर्यप्रकाश बंद होतो आणि त्या गावात हलकल्लोळ उडतो.परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी एका ज्योतिषाला पाचारण केले जाते, ज्यामुळे या महिलेच्या कुटुंबाला गावातून हद्दपार केले जाते, जे तो कोंबडा पुन्हा मिळवण्यासाठी एक अगतिक मोहीम हाती घेतात.
ला सिनेफच्या परीक्षकांनी या चित्रपटाच्या कथाकथन शैलीची आणि अतिशय तरबेज दिग्दर्शनाची प्रशंसा केली आहे. त्यांनी म्हटले आहे, "Une illumination qui, du fond de la nuit, brille par son humour et le sens de la miseen scène, le premier prix estattribué à Sunflowers Were the First Ones to Know de Chidananda S. Naik" (" एक प्रकाशमानता जी रात्रीच्या खोलीतून विनोदाने आणि अतिशय बारकाव्याने केलेल्या दिग्दर्शनातून झळाळते, प्रथम पुरस्काराचा मानकरी आहे चिदानंद नाईक यांचा ‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो’.")
चित्रपट दिग्दर्शक चिदानंद नाईक म्हणाले, “ मला जितकी आठवत होती तितकी ती सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. त्या कहाण्या केवळ ऐकण्याचा नव्हे तर प्रत्यक्षात त्यातील आयुष्याची अनुभूती घेण्याचे माझे उद्दिष्ट होत- एक अशी अनुभूती जिचा सूर जगभरातल्या प्रेक्षकांमध्ये घुमत राहील.”
पूर्णपणे रात्री चित्रित केलेला ‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो’ भारतीय परिदृश्याच्या खोलीमध्ये प्रेक्षकांना घेऊन जातो आणि त्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि वातावरणात सहभागी होण्याचे निमंत्रण देतो. नाईक यांचे दिग्दर्शन पारंपरिक कथाकथन आणि दृश्य चित्रिकरण यांचे कलात्मक मिश्रण आहे ज्यामुळे त्या प्रदेशाचे सौंदर्य अधिक खुलते आणि लोक आणि त्यांच्यात रुढ असलेल्या कथा यांच्यातील खोलवर रुजलेल्या बंधांचे महत्त्व अधोरेखित होते.
बंगळूरुच्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासह विविध महोत्सवांमध्ये प्रशंसनीय ठरलेला ‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो’ आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम चित्रपटांसोबत स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाला आहे. या लघुपटाच्या प्रसिद्धी मोहिमेमध्ये विशेष स्क्रीनिंग्ज, प्रसारमाध्यम संवाद आणि प्रश्नोत्तर सत्रांचा समावेश असेल, ज्यामध्ये अकादमी सदस्य आणि जागतिक प्रेक्षकांना भारताच्या कथाकथन परंपरेचे सार्वत्रिक सामर्थ्य लक्षात येईल. ‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो’ हा लघुपट या सर्व प्रशंसेच्या पलीकडे जात, जागतिक प्रेक्षकांना भावणाऱ्या सार्वत्रिक संकल्पनांना उजळून टाकत, भारतीय संस्कृती आणि कथाकथन यांमध्येही समरस होण्याची संधी देत आहे.
S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2070729)
Visitor Counter : 63