माहिती आणि प्रसारण मंत्रालय
त्वरा करा ! भारतातील उदयोन्मुख व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) कलाकारांसाठी सुवर्णसंधी
भारतातील ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स क्षेत्रातील संधी शोधण्यासाठी सज्ज असलेल्या तरुण कलाकारांसाठी नोंदणी सुरू
Posted On:
29 OCT 2024 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2024
जर तुम्ही सर्जनशील असाल, कथा सांगण्यात तरबेज असाल आणि 30 सेकंदांच्या व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) क्लिपद्वारे “डेली लाईफ सुपरहिरो” संकल्पना साकार करण्याची क्षमता बाळगून असाल, तर मग तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतच्या किमतीच्या वस्तू बक्षिस म्हणून जिंकण्याची तसेच विशेष स्टुडिओ आंतर्वासिता मिळवण्याची उत्तम संधी आहे. या स्पर्धेत केवळ बक्षिसेच जिंकू नका तर करिअर घडवण्याची संधी मिळवा कारण तुम्हाला या कामाचे प्रशिक्षित दिले जाईल तसेच तुमचे काम फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या जागतिक स्तरावरील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत व्यावसायिकांसमोर प्रदर्शित केले जाणार आहे. भारतातील व्हीएफएक्स परिसंस्थेला चालना देण्यासाठी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, एबीएआय या भारतातील अग्रगण्य एव्हीजीसी (ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) च्या सहकार्याने, जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद - 2025 (डब्ल्यूएव्हीईएस) चा भाग म्हणून डब्लूएएफएक्स डब्ल्यूएव्हीईएस व्हीएफएक्स चॅलेंज सुरू केले आहे.
चळवळीत सामील व्हा: आजच नाव नोंदणी करा
भारतातील उदयोन्मुख व्हिज्युअल इफेक्ट कलाकार डब्लूएएफएक्स डब्ल्यूएव्हीईएस व्हीएफएक्स चॅलेंजमध्ये सहभागी होऊ शकतात आणि वेगाने वाढणाऱ्या व्हीएफएक्स उद्योगात नाव कमवू शकतात. www.wafx.abai.avgc.in या संकेतस्थळावर अधिक तपशिल उपलब्ध असून आता नोंदणी खुली करण्यात आली आहे. ही स्पर्धा केवळ कौशल्य दाखवण्याची संधीच नाही, तर व्यावसायिक वाढीची एक पायरी देखील आहे,जी या क्षेत्रातील भारतातील शीर्ष व्हीएफएक्स स्टुडिओ आणि मार्गदर्शकांच्या मजबूत नेटवर्कमध्ये सामील होण्याची संधी देते.
अधिक माहितीसाठी, कृपया wafx@abai.avgc.in, generalsecretary@abai.avgc.in, www.wafx.abai.avgc.in वर संपर्क साधा.
स्पर्धेची रचना आणि बक्षिसे: डब्लूएएफएक्स मध्ये 3 टप्पे असतील
पहिल्या टप्प्यात ऑनलाइन पात्रता फेरी असेल जिथे 2000 हून अधिक प्रवेशीका येण्याची अपेक्षा आहे ज्यापैकी 'पूर्व-निवड' ज्युरी 10 विद्यार्थी आणि 10 व्यावसायिक स्पर्धकांना दुसऱ्या टप्प्यात जाण्यासाठी आणि विभागीय स्तरावरील वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी निवडतील. त्यानंतर, विभागीय विजेते ग्रँड फिनालेमध्ये जातील जे 24-तास व्हीएफएक्स मॅरेथॉन स्वरूपात होणाऱ्या फेरीत राष्ट्रीय पुरस्कार-विजेत्या प्रसिद्ध व्हीएफएक्स पर्यवेक्षकांच्या ग्रँड ज्युरीसमोर आपल्या कलेचे प्रदर्शन करतील.
डब्लूएएफएक्समधील सहभागी ‘दैनंदिन जीवनातील सुपरहिरो’ ही संकल्पना 30 सेंकदांच्या व्हीएफएक्समार्फत साकारतील आणि त्यांचे हे काम पात्रता फेरीसाठी ऑनलाईन पाठवतील. पात्रता फेरीत 5 लाख रुपयांपर्यंतची एकूण बक्षिसे जिंकण्याची आणि स्टुडिओमध्ये समावेशक प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याच्या संधी आहेत. पात्र ठरलेल्या विजेत्यांना चंदिगढ, मुंबई, बंगळुरू आणि कोलकाता या प्रादेशिक विभागांमध्ये नेमलेल्या या क्षेत्रातील नामांकित तज्ञांसमोर आपापले काम प्रदर्शित करण्याची संधी दिली जाईल. या फेरीतील विजेत्यांमध्ये अंतिम फेरीसाठी दिल्लीत 5 ते 9 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित वेव्हज् शिखर परिषदेत स्पर्धा होईल.
आकांक्षी व्हीएफएक्स कलाकारांना सक्षम करण्यासाठी आणि भारताचे जागतिक पातळीवरील स्थान उंचावण्यासाठी डब्लूएएफएक्स आव्हान
या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्दीष्ट व्हीएफएक्स व्यावसायिकांच्या पिढीला या क्षेत्रातील मागणी पुरवण्यासाठी तयार करणे आणि भारताचे कौशल्य आणि जागतिक स्पर्धेतील स्थान उंचावणे असे आहे.
डब्लूएएफएक्स वेव्हज् व्हीएफएक्स आव्हान – संपन्न भवितव्यासाठी युवांमधील सुप्त गुणांना वाव
भारतीय चित्रपट त्यांची सृजनशीलता आणि कथाकथनासाठी जगात ओळखला जात असून आंतरराष्ट्रीय निकषांवर ते जगातील इतर चित्रपटांशी स्पर्धा करू लागला आहे, यामागे आपली व्हीएफएक्स क्षमतेतील उत्क्रांती आहे. तरीदेखील या क्षेत्रातील वाढत्या मागणीला पुरेसे ठरतील अशा कुशल व्यावसायिकांची कमतरता आहे. या उद्योगाच्या शाश्वत वाढीसाठी व्हीएफएक्समधील कौशल्य विकास आणि रोजगार महत्त्वाचे ठरतात. एबीएआयचा महत्त्वाची स्पर्धा असलेले डब्लूएएफएक्स वेव्हज् आव्हान युवा प्रतिभेचा शोध घेऊन त्यांना एव्हीजीसी क्षेत्रातील नव्या संधींसाठी तयार करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आले आहे.
* * *
N.Chitale/Shraddha/Reshma/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2069419)
Visitor Counter : 20