राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती भवनात कोणार्क चक्रांच्या प्रतिकृती
Posted On:
29 OCT 2024 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2024
वालुकामय खडकापासून बनवलेल्या कोणार्क चक्रांच्या चार प्रतिकृती राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्र आणि अमृत उद्यानात ठेवण्यात आल्या आहेत. राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी देशभरातून येणाऱ्या लोकांना देशाच्या संपन्न वारशाचे दर्शन घडवण्याच्या आणि त्याच्या जतनासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने कोणार्क चक्राच्या प्रतिकृती इथे ठेवल्या आहेत. पारंपरिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटकांची ओळख करून देण्याच्या हेतूने राष्ट्रपती भवनात सुरू केलेल्या विविध उपक्रमांचा भाग म्हणून ही मांडणी करण्यात आली आहे.
कोणार्कचे सूर्य मंदिर हे मंदिर उभारणीच्या उडिया मंदिर शैलीचे दर्शन घडवते व त्याला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जाही दिला आहे. सूर्य देवाच्या प्रचंड रथाच्या आकारात हे मंदिर उभारले असून या रथाची चाके अर्थात कोणार्क चक्रे ही भारताच्या सांस्कृतिक वारशाचे चिन्ह आहेत.
* * *
N.Chitale/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2069414)
Visitor Counter : 23