गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे भारतीय पोलीस सेवेतील परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद साधणार


भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प साकारण्यात युवा पोलिस अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका

Posted On: 14 OCT 2024 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2024

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्लीत 76 आरआर (2023 तुकडी) च्या भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. संवादादरम्यान, परिविक्षाधीन अधिकारी त्यांचे प्रशिक्षण अनुभव केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांसोबत सामायिक करतील.

भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प साकारण्यात युवा  पोलिस अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. बैठकीदरम्यान, देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांकडून मार्गदर्शनही मिळणार आहे.

भारतीय पोलीस सेवा 2023 च्या तुकडीत, 54 महिला अधिकाऱ्यांसह एकूण 188 अधिकारी प्रशिक्षणार्थींनी मूलभूत अभ्यासक्रम प्रशिक्षण टप्पा-1 पूर्ण केला आहे. दिल्लीतील विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि केंद्रीय पोलीस संघटना (सीपीओ) यांच्यासोबत दोन आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर, आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकारी त्यांच्या संबंधित कॅडरमध्ये 29 आठवड्यांचे जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेतील.

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2064704) Visitor Counter : 41