आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या 8व्या स्थापना दिन सोहळ्याला राष्ट्रपतींची उपस्थिती


आयुर्वेद ही जगातील सर्वात प्राचीन सर्वांगीण वैद्यकीय प्रणालीपैकी एक आहे. ती मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करते: द्रौपदी मुर्मू

आयुर्वेद ही अत्यंत प्राचीन वैद्यकीय प्रणाली असून ती जगात अतिशय वेगाने लोकप्रिय होत आहे: प्रतापराव जाधव

Posted On: 09 OCT 2024 5:20PM by PIB Mumbai

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू  आज नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या (एआयआयए ) 8व्या स्थापना दिन सोहळ्याला  उपस्थित राहिल्या . यावेळी त्यांनी एआयआयएच्या संकुलालाही  भेट दिली. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना,  आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि एआयआयए चे वरिष्ठ प्राध्यापक सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.

स्थापना दिन सोहळ्याच्या निमित्ताने आयुष औषधी फार्मसी कार्यक्रम आणि  शाश्वत आयुष एक्स्पोचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. आयुर्वेदाद्वारे आरोग्य सेवा वितरणात  वाढ करून सर्वांसाठी दर्जेदार आयुर्वेदिक औषधे उपलब्ध करून देणे हे फार्मसीचे उद्दिष्ट आहे.

यावेळी बोलताना  राष्ट्रपती म्हणाल्या , “आयुर्वेद ही जगातील सर्वात प्राचीन सर्वांगीण  वैद्यकीय प्रणालीपैकी एक  आहे. ती मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करते.  आयुर्वेद वैद्यकीय प्रणाली हा आपला वारसा आहे आणि आयुष मंत्रालय हा वारसा एक प्रामाणिक वैद्यकीय प्रणाली म्हणून प्रस्थापित करण्याचे काम  करत आहे. 2014 मध्ये स्थापन झाल्यापासून गेल्या 10 वर्षांत आयुष मंत्रालय पारंपारिक वैद्यकीय प्रणालींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे मला सांगण्यात आले. आयुष मंत्रालयाने शिक्षण, संशोधन, औषधांची गुणवत्ता नियंत्रण, औषधोपचार आणि सार्वजनिक आरोग्य यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण  बदल केले आहेत.
उद्घाटनानंतरच्या अवघ्या 5 वर्षांच्या कालावधीत, एआयआयए गोवा ने एक उल्लेखनीय कामगिरी करणारी संस्था म्हणून नावारूपाला आली  जी आज पारंपारिक वैद्यकीय उपचारांसाठी प्रवास आणि वैद्यकीय आरोग्य पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनत आहे.
आज या संस्थेत होत असलेले काम पाहून मला विश्वास वाटतो की, आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण आयुर्वेदासारखा आपला वारसा आपल्या आजी-आजोबांच्या औषधांसह पुढे नेऊ शकतो आणि पुराव्याच्या आधारे तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून त्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देऊ शकतो. मला सांगण्यात आले आहे की या वर्षीच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना  आहे - 'जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेद नवोन्मेष', जी आजच्या काळाची गरज आहे आणि मला आशा आहे की या माध्यमातून आयुर्वेद अधिकाधिक लोकांपर्यंत सहजरीत्या  पोहोचू शकेल. यासाठी मी आयुष मंत्रालयाला शुभेच्छा देतो.

दिल्लीचे नायब राज्यपाल  विनय कुमार सक्सेना म्हणाले, “आपण मागे वळून पाहिले तर 2014 मध्ये स्थापना झाल्यापासून, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने जगभरातील आरोग्य सेवा प्रणालींमध्ये  नवीन आशा जागवली आहे. आतापर्यंतचा  प्रवास पाहून एआयआयएने समुदायाच्या आरोग्यासाठी  केलेल्या कामाने  मी विशेष प्रभावित झालो आहे, ज्यात  विविध प्रकारातील  28 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या आहेत. 
आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  प्रतापराव जाधव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच घोषणा केली आहे की पुढील पाच वर्षांत देशात 10 नवीन आयुर्वेद संस्था उघडल्या जातील.

प्रतापराव पुढे म्हणाले की, ‘राष्ट्रपतींनी आपल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला भेट दिली त्यामुळे आज आयुष मंत्रालयासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे . आयुर्वेद ही एक अतिशय प्राचीन वैद्यकीय प्रणाली असून ती जगात अतिशय वेगाने लोकप्रिय होत आहे. ते म्हणाले की, आयुष मंत्रालयाने ग्रामीण भागात अस्सल आणि स्वस्त आयुर्वेदिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी "आयुष औषधी केंद्र" सुरू केले आहे.
गेल्या सात वर्षांत,  पारंपारिक औषधांच्या एकीकरणाला  आणि प्रचाराला चालना देण्यात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. या संस्थेने  आपल्या 44 विशेष दवाखान्यांद्वारे 27 लाखांहून अधिक रूग्णांना उपचार दिले आहेत आणि देशभरात उच्च दर्जाची आयुर्वेदिक आरोग्यसेवा प्रदान करण्याप्रती वचनबद्धतेला बळ दिले आहे.
एकूण 73 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे, ज्यामुळे आयुर्वेदाच्या क्षेत्रात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे जागतिक आणि देशांतर्गत सहकार्य आणखी मजबूत होईल.
आयुर्वेद आपला समृद्ध वारसा आणि आरोग्याप्रति  सर्वांगीण दृष्टीकोनासह  शारीरिक, मानसिक आणि भावनिक कल्याणासाठी मौल्यवान सूचना प्रदान करते.  . पर्यावरणीय ऱ्हासाच्या आव्हानाला सामोरे जात  आयुर्वेद सर्वसमावेशक उपाय प्रदान करतो जे केवळ वैयक्तिक आरोग्यच नव्हे तर आपल्या पर्यावरणाच्या हितालाही  प्रोत्साहन देतात.

***

SonalT/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2064102) Visitor Counter : 37