पंतप्रधान कार्यालय
खादी विक्रीचा नवा विक्रम ही उत्साहवर्धक कामगिरी अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक
देशाच्या नागरिकांमध्ये स्वदेशीचा कल वेगाने वाढतो आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रविष्टि तिथि:
05 OCT 2024 2:56PM by PIB Mumbai
खादी विक्रीने नोंदवलेला नवा विक्रम म्हणजे उत्साहवर्धक कामगिरी असल्याचे म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विक्रमाचे आज कौतुक केले आहे. देशातल्या नागरिकांमध्ये स्वदेशीचा कल वेगाने वाढत असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
खादी इंडियाने एक्स या समाजमाध्यमावर केलेल्या एका संदेशाला प्रतिसाद देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला संदेश :
“अतिशय उत्साहवर्धक कामगिरी! खादी विक्रीचा हा नवा विक्रम हेच दर्शवतो की देशाच्या नागरिकांमध्ये स्वदेशीचा कल किती वेगाने वाढतो आहे. मला आनंद आहे की, ही भावना खादीशी जोडल्या गेलेल्या आपल्या कारागीर बंधू - भगिनींचे जीवन सुकर होण्यातही खूपच उपयुक्त ठरू लागली आहे.”
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2062367)
आगंतुक पटल : 87
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam