गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते गुजरातमध्ये अहमदाबाद महानगरपालिकेतील 919 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकार्यांचे उद्घाटन आणि पायाभरणी
प्रविष्टि तिथि:
03 OCT 2024 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2024
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज अहमदाबाद महानगरपालिकेतील (एएमसी) विविध विकासकार्यांसह, 919 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
नवरात्रीच्या शुभेच्छांसह भाषण सुरु करून केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, आज 919 कोटी रुपये खर्चाच्या ज्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली आहे, त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, वाचनालये, बगीचे आणि छोट्या फेरीवाल्यांशी संबंधित कामांचा समावेश आहे. यामध्ये महानगरपालिका नगर प्राथमिक शिक्षण समितीतर्फे आधुनिक विद्यालयांची उभारणी हा सर्वात उल्लेखनीय प्रकल्प आहे असे त्यांनी सांगितले.

अहमदाबाद शहराला येत्या स्वच्छता सर्वेक्षणात वरचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर त्यांनी अधिक भर दिला.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की महात्मा गांधी यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय पातळीवरील एकमेव असे नेते आहेत ज्यांनी स्वच्छता अभियानाला लोकांच्या चळवळीत रुपांतरित केले.देशातील प्रत्येक घरात शौचालय असले पाहिजे हा विचार पंतप्रधान मोदी यांनी मांडला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 70 वर्षांनी,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरु केले.तसेच देशातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती जोपासत, देशातील प्रत्येक घरात पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध होईल तसेच आपली घरे, सोसायट्या, रस्ते, शहरे आणि गावे स्वच्छ असतील याची सुनिश्चिती करून घेणे हा पंतप्रधानांचा उद्देश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडपासून केरळ पर्यंत आणि उत्तर प्रदेशापासून आसाम पर्यंत संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियानाला आणि तत्संबंधी मूल्यांना चालना देण्यासाठी अथक परिश्रम केले आहेत असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2061758)
आगंतुक पटल : 84