पंतप्रधान कार्यालय
अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
30 SEP 2024 1:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2024
भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मिथुन चक्रवर्ती हे देशाचे सांस्कृतिक आयकॉन असून अष्टपैलू प्रतिभेसाठी पिढ्यानपिढ्या त्यांचे कौतुक केले जात आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या एक्स वरील संदेशाला उत्तर देताना त्यांनी लिहिले:
"भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल श्री मिथुन चक्रवर्ती जी यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे, याबद्दल आनंद झाला. ते सांस्कृतिक आयकॉन असून अष्टपैलू प्रतिभेसाठी पिढ्यानपिढ्या त्यांचे कौतुक केले जात आहे. त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा."
* * *
JPS/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2060209)
आगंतुक पटल : 239
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam